Hair : कुरळ्या केसांना ठेवा चमकदार आणि सुंदर; वाचा ३ सोप्या टिप्स

160

तुमचे केस Hair कुरळे असतील तर तुम्हाला बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच केसांची चमक राखून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. या समस्यांवर उपाय म्हणून खाली दिलेले ४ उपाय तुम्ही वापरु शकता. सूर्याची हानिकारक किरणे त्वचा आणि केस दोन्हींसाठी नुकसानकारक असतात. त्वचेवर याचा परिणाम होतो. यामुळे वेगवेगळे प्रकारचे डाग, त्वचेवरील चमक कमी होते. त्यामुळे त्वचेसह केसांनाही संरक्षण देण गरचेच आहे. पावसाळा असो किंवा उन्हाळा केसांची काळजी कशी घ्यावी हे समजणे गरजेचे आहे.

नारळाचे तेल त्वचेसह केसांसाठीही फायद्याचे आहे. नारळाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन आणि अँटी ऑक्सडेंट असते. त्यामुळे केसांचा गुंता आणि केस तुटण्यापासून वाचतात. केसांना शाम्पू लावण्याआधी नारळाचे तेल लावून, केस Hair धुतल्यानंतर हलकेसे नारळाचे तेल लावावे. त्यामुळे केसांना संरक्षण मिळते आणि त्यांना सावरणेही सोपे होतेय.

(हेही वाचा NewsClick च्या संपादकाला अटक; चीनकडून पैसा घेतल्याचा आरोप)

हीट प्रोटेक्शन स्प्रे 

कोणत्याही कार्यक्रम, लग्न समारंभामध्ये केसांची हेअरस्टाईल करायची असेल तर हीट प्रोटेक्शन स्प्रेचा वापर करावा. त्यामुळे केसांचा गुंता होत नाही. त्याचबरोबर हेअरस्टाईल करतानाच नाही, तर रोज घरातून बाहेर पडताना हीट प्रोटेक्शन स्प्रेचा वापर करावा. त्यामुळे सूर्याची हानिकारक किरण तुमच्या केसांची चमक आणि सोंदर्य कमी करू शकणार नाहीत.

खाण्या पिण्याकडे नीट लक्ष देणे 

केसांचे सोंदर्य आणि चमक टिकवून ठेवायचे असेल तर आपल्या खाण्या पिण्याकडे ही लक्ष ठेवले पाहिजे. अँटीऑक्सीडेंट भरपूर असलेल्या पदार्थांचे प्रमाण आहारात जास्त ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर व्हिटॅमिन सी, ई आणि ए असलेले खाद्यपदार्थ, गाजर, हिरव्या पालेभाज्या, फळे, आंबे, केसांसाठी आवश्यक आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.