जर तुम्ही सेकंड हँड आयफोन खरेदी करत असाल तर या गोष्टी नक्की पहा. जर तुम्ही या गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे मोठे नुकसान होईल. तुम्ही विकत घेतलेल्या फोनच्या दुप्पट रक्कम तुम्हाला खर्च करावी लागू शकते. अशा परिस्थितीत जुना (Second Hand iPhone) खरेदी करताना या गोष्टी तपासायला विसरू नका.
अनेकदा लोक ऑनलाइन स्वस्त आयफोन खरेदी करण्याच्या प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत काही लोक सेकंड हँड आयफोन (Second Hand iPhone) खरेदी करण्याचा विचार करतात. यामागील कारण म्हणजे त्याच्या भरमसाट किमतीमुळे आयफोन बहुतेक लोकांच्या बजेटमध्ये बसत नाही. सेकंड हँड डिव्हाईस खरेदी करण्यात काहीही नुकसान नाही बऱ्याच वेळा ही तुमच्यासाठी फायदेशीर डीलही ठरू शकते, परंतु सेकंड हँड आयफोन खरेदी करण्यापूर्वी तुम्ही त्यातील काही गोष्टी तपासल्या पाहिजेत. असे न केल्यास तुमचे मोठे नुकसान होईल व उलट दुरुस्तीसाठी तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसेल.
(हेही वाचा – Virat Kohli भरमैदानात अंपायरवर का संतापला?)
जेव्हा कधी तुम्ही सेकंड हँड आयफोन (Second Hand iPhone) खरेदी करत असाल त्यावेळी विक्रेत्याकडे आयफोनचे ओरिजल बिल असल्याची खात्री करा. फोन खरेदी केल्याची योग्य तारीख व इतर डिटेल्स तपासण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. आयफोनच्या वॉरंटीविषयी जाणून घेण्यासाठी प्रथम आयफोनच्या सेटिंग्जमध्ये जा, जनरल ऑप्शनवर क्लिक करा आणि यानंतर अबाउट पर्यायावर क्लिक करा.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community