-
ऋजुता लुकतुके
रिअलमी कंपनी यंदा एकदमच जोरात आहे. नुकतीत कंपनीने आपली रिअल १२ प्रो सीरिज भारतात लाँच केली होती. आता काही महिन्यातच मार्चमध्ये कंपनीने आपले दोन नवीन फोन रिअलमी १२ ५जी आणि १२ प्लस ५जी असे दोन नवीन फोन बाजारात आणले आहेत. दोघांचा लुक बराचसा सारखा आहे. पण, प्लस फोन ५जी आणि खिशाला परवडतील असे आहेत.
मागून हा प्लस आणि प्रो असे दोन्ही फोन सारखेच दिसतात. प्लस सीरिजला लेदर केस देण्यात आली आहे. पण, कॅमेरांची चौकट अगदी तशीच आहे. बाकी फोनचं ब्रँडिंगही अगदी खालच्या बाजूला लोगोपुरतं येतं. विशेष म्हणजे या फोनमध्ये खाली सी-चार्जरचा पोर्ट दिलाय. तर वर जुन्या फोन प्रमाणे ३.५ ऑडिओ जॅक देऊन मायक्रोफोन किंवा इअरफोनची स्वतंत्र सोय केली आहे. अलीकडे हे दोन पोर्ट वेगळे नसतात. (Realme 12 plus 5g)
बाकी फोनला ६.७ इंचांचा एमोल्ड डिस्प्ले आहे. रिअलमी ने जाहिरातच अशी केलीय की, या फोनमध्ये पाणी, धूळ यापैकी काही जाऊ सकत नाही. त्यामुळे पावसात आणि तुमचे हात ओले असतानाही तुम्ही फोन वापरू शकता असा कंपनीचा दावा आहे.
(हेही वाचा – Novak Djokovic : नोवाक जोकोविचने गोरान इव्हानोसेविचबरोबरची भागिदारी का मोडली?)
Realme 12 plus 5G pic.twitter.com/X1u28dOJT6
— Moid Malik (@MoidMalik10) March 20, 2024
रिअलमी १२ प्लस (Realme 12 plus 5g) श्रेणीतील फोन हे २०,००० रुपयांच्या आतील आहेत. असं असतानाही फोनमध्ये प्राथमिक कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे. आणि त्यात सोनी एलवायटी ६०० ही ऑप्टिकल लेन्स वापरण्यात आली आहे. कॅमेरा हे रिअलमी १२ सीरिजचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्यं आहे. आणि १२ प्लस फोनमध्येही यात कुठलीही तडजोड केलेली नाही. प्राथमिक कॅमेरा ५० जीबीचा. तर अल्ट्रा वाईड लेन्स ८ मेगापिक्सेल आणि डेप्थ देणारी लेन्स २ मेगापिक्सेलची आहे. सेल्फी कॅमेरा १६ मेगापिक्सेल क्षमतेचा आहे.
१२ प्रो प्रमाणेच या फोनमध्येही ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. आणि चार्जर ६७ वॅट फास्ट चार्जिंगचा आहे. शिवाय चार्जर फोनबरोबर बॉक्समध्ये येतो. आणि ४८ मिनिटांत तो फोन चार्जही करतो. अँड्रॉईड १४ प्रणालीवर हा फोन चालतो. नथिंग फोन २ए बरोबर या फोनची स्पर्धा असेल. (Realme 12 plus 5g)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community