-
ऋजुता लुकतुके
मोबाईल फोनचा रिअलमी हा ब्रँड स्वस्तातील मस्त फोन बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे प्रिमिअम फोनमधील फिचर ही कंपनी त्यांच्या स्वस्त फोनमध्ये तुम्हाला उपलब्ध करून देते. आताही ५जी फोन कंपनीने आणलाय तो रिअलमी १२ एक्स (Realme 12x) या मॉडेलमध्ये. फोनचा डिस्प्ले ६.७२ इंचांचा आहे. ४ जीबी रॅमपासून फोनची सुरुवात होते. आणि पुढे ही रॅम ६ जीबी किंवा ८ जीबी पर्यंत वाढू शकते. ४ जीबीचा प्राथमिक फोन १६,९९९ रुपयांत उपलब्ध आहे. पण, सध्या फ्लिपकार्टवर हाच फोन सवलतीच्या दरात ११,९९९ रुपयांना मिळतोय.
फोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्झ आणि प्रखरता ९५० नीट्स इतकी आहे. तर फोनचा प्रोसेसर मीडियाटेक ६१००+ हा आहे. गेमिंगसाठी फोनचा अतीवापर झाला तर तो गरम होऊ शकतो. हे लक्षात घेऊन रिअलमीने या फोनमध्ये व्हेपर चेंबर कूलिंग यंत्रणा बसवली आहे. फोनची बॅटरीही ५००० एमएएच क्षमतेची आहे. आणि सोबत ४० वॅट क्षमतेचा सुपरचार्जरही कंपनीने देऊ केला आहे.
(हेही वाचा – Sharad pawar: शरद पवार गटाकडून दोन उमेदवार जाहीर)
Realme 12x 5G launched in India.
Specifications
📱 6.72″ FHD+ IPS LCD display 950nits peak brightness, 120Hz refresh rate
🔳 MediaTek Dimensity 6100+ SoC TSMC 6nm process
2X Arm Cortex-A76 up to 2.2GHz
6X Arm Cortex-A55 up to 2.0GHz
Mali-G57 MC2 GPU
LPDDR4x RAM, UFS 2.2 storage… pic.twitter.com/TiRgLytRhe— Abhishek Yadav (@yabhishekhd) April 2, 2024
फोनची बॅटरी ३० मिनिटांत ५० टक्के फोन चार्ज करू शकते. आणि संपूर्ण चार्ज झालेला फोन ३४ तासांचा कॉल टाईम देऊ शकतो, असा कंपनीचा दावा आहे. तसंच १५ तासांचं व्हीडिओ स्ट्रिमिंग आणि ३५ तास गाणी ऐकली जाऊ शकतात. याशिवाय रिअलमी १२ एक्सची (Realme 12x) आणखी एक खासियत म्हणजे यातील एअर जेस्चर यंत्रणा. यामुळे फोनला हात न लावता तो तुमच्यासाठी काही कामं करू शकतो. तुम्ही स्वयंपाकघरात असाल किंवा जेवत असाल किंवा इतर महत्त्वाची काम करत असाल तरी हात न लावता तुम्ही कॉल करण्यापासून इतर कामंही करू शकता.
फोनचा कॅमेरा ५० मेगा पिक्सेलचा आहे. आणि यात रात्रीच्या वेळी कमी प्रकाशात चांगला फोटो काढण्याची सोय आहे. तसंच स्ट्रिट फोटोग्राफी मोडही या कॅमेरात आहे. आणि फोनचं स्टोरेजही २ टेराबाईटपर्यंत वाढवण्याची सोय आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community