- ऋजुता लुकतुके
रिअलमी फोनची तरुणांमध्ये मोठी बाजारपेठ आहे ती त्याच्या कॅमेरासाठी. रिअलमी प्रो १२ बाजारात आला तेव्हा त्यांनी तब्बल ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा या फोनमध्ये बसवला होता. सध्या कंपनीने रिअलमी १४ प्रो ५जी आणि बड्स वायरलेस ५ अशी दोन नवीन उत्पादनं बाजारात आणली आहेत. त्यांची विक्रीही ऑनलाईन सुरू झाली आहे. आणि यावेळी या फोनचं वेगळेपण आहे ते रंगात. म्हणजे रंग बदलणाऱ्या तंत्रज्ञानात. हा फोन थंडीत चक्क आपला रंग बदलतो. म्हणजे एरवी पांढरा असलेलं या फोनचं कव्हर तापमान १६ अंश सेल्सिअसच्या खाली गेलं की, फिकट निळं होतं. हे खास तंत्रज्ञान कंपनीने डॅनिश फोन डिझायनर स्टुडिओ व्हेलर यांच्याकडून बनवून घेतलं आहे. जगातील रंग बदलणारे हे पहिले फोन असतील. (Realme 14 Pro 5G)
रिअलमीच्या लौकिकाप्रमाणे हे आधुनिक तंत्रज्ञान आणूनही फोनची किंमत त्या मानाने किफायतशीर आहे. १४ प्रो-५जी फोन हा ६.८ इंच डिस्प्लेसह येतो आणि यात सोनीचा पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा बसवण्यात आला आहे. या फोनमध्ये मॅजिक ग्लो ट्रिपल फ्लॅश यंत्रणा आहे जी कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम करते. फोनमधील चिपसेट हा स्नॅपड्रॅगन ७ व्या पिढीतील आहे. (Realme 14 Pro 5G)
(हेही वाचा – Delhi Assembly Election : काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच स्वीकारला पराभव; ‘हे’ नेते प्रचारातून गायब)
When the lights went low, the Triple Flash Camera stole the show! #realme14ProSeries5G
Here’s how we brought the spotlight to life during the launch—right from a dazzling party room. Are you ready to shine in dark?Pre-book now:https://t.co/eMN1A8VRXn https://t.co/Da5PlSGbru pic.twitter.com/7hCyYbrcag
— realme (@realmeIndia) January 18, 2025
फोनमधील बॅटरी ६,००० एमएएच क्षमतेची आहे. मोतीया, करडा आणि जांभळ्या रंगात हा फोन उपलब्ध आहे. रिअलमी १४ प्रो ५जी फोनची किंमत २७,९९९ रुपयांपासून सुरू होते. तिथपासून ते १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेला फोन ३०,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध होईल. सध्या या फोनमध्ये विविध प्रकारच्या सवलती धरून रुपये ४,००० पर्यंत सवलतही मिळत आहे. या फोनबरोबरच कंपनीने वायरलेस बड्सही बाजारात आणले आहेत. कंपनीचे पाचव्या पिढीतील बड्स आहेत. (Realme 14 Pro 5G)
यात नॉईज कॅन्सलेशनसाठी कंपनीने एक नवीन यंत्रणा बसवली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर हे बड ३८ तास चालू शकतात. त्यांची किंमत १,७९९ रुपये इतकी आहे. आणि सध्या सवलतीच्या दरांत ते १,५९९ रुपयांना उपलब्ध आहेत. (Realme 14 Pro 5G)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community