Realme P3 Deals : जाणून घ्या रिअलमीच्या पी सीरिजवर किती आहे सूट? फोन कधी मिळणार बाजारात

१८ फेब्रुवारीला रिअमीची पी सीरिज लाँच झाली आहे.

28
Realme P3 Deals : जाणून घ्या रिअलमीच्या पी सीरिजवर किती आहे सूट? फोन कधी मिळणार बाजारात
Realme P3 Deals : जाणून घ्या रिअलमीच्या पी सीरिजवर किती आहे सूट? फोन कधी मिळणार बाजारात
  • ऋजुता लुकतुके

रिअलमीचे पी३ प्रो आणि पी३एक्स हे दोन फोन भारतीय बाजारांत लाँच झाले आहेत. पहिला फोन हा स्नॅपड्रॅगन प्रोसेसरवर आधारित आहे. तर दुसरा पीएक्स३ ही फोन मीडियाटेक डिमेन्सिटी प्रोसेसर असलेला स्वस्तातील मस्त फोन आहे. आता फोन लाँच झाला असला तरी २५ फेब्रुवारीला तो देशभरात मोबाईल दुकांमध्ये आणि ॲमेझॉन, फ्लिपकार्टसह सर्व ई-कॉमर्स वेबसाईटवर उपलब्ध होईल.

रिअलमी पी३ प्रो (Realme P3 Pro) हा फोन मंद हिरव्या रंगाबरोबरच जांभळ्या आणि तपकिरी रंगातही उपलब्ध आहे. या फोनचे फिचर बघितलेत तर ६.८ इंचांचा एमोल्ड डिस्प्ले या फोनला देण्यात आला आहे. त्याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्झचा आहे. हा फोन वाळू आणि पाण्यापासून सुरक्षित आहे. फोनच्या आत स्नॅपड्रॅगनचा सातव्या पिढीतील ऑक्टा ३ प्रोसेसर बसवण्यात आला आहे. पी३ एक्स मालिकेतील डिस्प्ले हा ६.३ इंचांचा आहे. आणि यात दोन सिमबरोबरच एक एसडी कार्ड स्टोरेज स्लॉटही देण्यात आला आहे. (Realme P3 Deals)

(हेही वाचा – Tesla in India : टेस्ला कंपनीचा भारतात चंचूप्रवेश, सुरू केली नोकरभरती)

(हेही वाचा – Apple iPhone SE 4 : ॲपलचा सगळ्यात स्वस्त एसई ४ होणार लाँच, टीम कूकनी दिले संकेत)

रिअलमी पी३ प्रोमधील (Realme P3 Pro) मुख्य कॅमेरा हा ५० मेगापिक्सेलचा सोनी कॅमेरा आहे. तर यात २ मेगापिक्सेलचा डेप्थ कॅमेराही देण्यात आला आहे. शिवाय यात एलईडी लाईटही आहे. सेल्फी कॅमेरा हा १६ मेगापिक्सेलचा आहे. हा फोन ८ जीबी तसंच १२ जीबीच्या रॅमसह उपलब्ध आहे. तर स्टोरेजही १२४ जीबी आणि २५६ जीबींचं उपलब्ध असेल. बॅटरी ६,००० एमएएच क्षमतेची आहे. तर ८० वॅटचा जलदगती चार्जर २० मिनिटांत फोन पूर्णपणे चार्ज करतो. त्या मानाने पी३एक्स फोनचा फास्ट चार्जर हा ४५ वॉट क्षमतेचा आहे. (Realme P3 Deals)

सुरुवातीला कंपनीने फोनवर आकर्षक सूट देऊ केली आहे. तुम्ही आता हा फोन बुक केलात तर पी३ प्रो फोनवर तुम्हाला २,००० रुपयांची सूट मिळू शकेल. त्यासाठी विविध बँकांच्या क्रेडिट कार्डाशी कंपनीने भागिदारी केली आहे. तर पी३एक्स फोनवर तुम्हाला १,००० रुपयांची सूट मिळेल. बँक ऑफर अंतर्गत ही सूट कंपनीने देऊ केली आहे. पी२ प्रो मालिका ही २३,९९९ रुपयांपासून सुरू होते. आणि सगळ्यात महागडा फोन हा २६,९९९ रुपयांचा आहे. तर पी३ एक्स हा फोन १३,९९९ रुपयांपासून सुरू होऊन १६,९९९ रुपयांपर्यंत आहे. या किमतीवरच सूट लागू होईल. (Realme P3 Deals)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.