WhatsApp वर करता येणार काॅल रेकाॅर्ड; ‘या’ स्टेप्स करा फाॅलो

81

सध्या व्हाॅट्सअॅप (WhatsApp) हे सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. जगभरात व्हाॅट्सअॅप वापरणा-यांची संख्या सर्वाधिक आहे. अनेकजण व्हाॅट्सअॅप काॅल रेकाॅर्ड (WhatsApp Call record)  करता येत नाहीत म्हणून व्हाॅट्सअॅप काॅल करतात. परंतु आता तुम्ही व्हाॅट्सअॅप काॅल रेकाॅर्ड करु शकता. त्यासाठी तुम्हाला एक अॅप डाऊनलोड करावा लागेल. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर (Google Play store) असून फ्रीमध्ये डाऊनलोड करु शकता. या अॅपचे नाव Call Recorder- Cube ACR आहे. या अॅपवरुन तुम्ही प्रत्येक काॅल रेकाॅर्ड करु शकता.

काॅल रेकाॅर्ड करण्यासाठी काय करावे, असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. यासाठी तुम्हाला प्रत्येक स्टेप्स सांगणार आहोत. आयफोन वापरकर्त्यांना या अॅपचा वापर करता येणार नाही. मात्र, इतर अॅप असून त्यासाठी पैसे मोजावे लागतील.

व्हाॅट्सअॅपवर काॅल रेकाॅर्ड करण्याची पद्धत

  • व्हाॅट्सअॅपवर काॅल रेकाॅर्ड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जावे लागेल
  • गुगल स्टोअरवरुन Call Recorder-Cube ACR अॅप डाऊनलोड करा. हे अॅप फ्री आहे.
  • अॅप डाऊनलोड केल्यानंतर फोन अॅक्सेसिबिलिटीबाबत जा. तिथे सेटिंग्ज सेक्शनमध्ये जा.
  • यानंतर अॅप कनेक्टर इनेबल करा. त्यानंतर परमिशन मागितली जाईल तेव्हा Allow करा.
  • इथे काही पर्याय दिले जातील, तेव्हा व्हाॅट्सअॅप निवडा.
  • आता व्हाॅट्सअॅपवर येणारा प्रत्येक काॅल रेकाॅर्ड केला जाईल. रेकाॅर्डिंग फोनमध्ये सेव्ह होईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.