Redmi 13 5G : शिओमी कंपनीचा परवडणारा ५जी फोन भारतात होतोय लाँच

रेडमी १३ ५जी फोनची किंमत १३,९९९ रुपयांपासून सुरू होत आहे.

248
Redmi 13 5G : शिओमी कंपनीचा परवडणारा ५जी फोन भारतात होतोय लाँच
Redmi 13 5G : शिओमी कंपनीचा परवडणारा ५जी फोन भारतात होतोय लाँच
  • ऋजुता लुकतुके

शिओमी या चिनी मोबाईल फोन कंपनीला भारतात येऊन आता १० वर्षं झाली आहेत. आणि दहाव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून कंपनीने भारतात आपला नवीन रेडीमी १३ ५जी (Redmi 13 5G) फोनही लाँच केला आहे. जुन्या १२ ५जी फोनचंच डिझाईन असलेला हा फोन फिचर्सच्या बाबतीत मात्र आधुनिक आहे. आणि यात चक्क १०८ मेगा पिक्सेलचा कॅमेराही आहे. फोनचा डिस्प्ले हा पहिल्यांदाच क्रिस्टल ग्लासपासून बनवला आहे.

आतापर्यंत कंपनीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या फोनची जोरदार जाहिरात केली आहे. त्यामुळे या फोनची किंमत, फिचर हे सगळं आपल्याला समजू शकतं.

रेडमी १३ प्रो चा डिस्प्ले हा एमोल्ड डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट १२ हर्ट्झ आहे आणि गोरिला ग्लासचं संरक्षणही त्याला आहे. हा फोन सुपरथिन म्हणजे जास्त जास्त जाड नसल्याचं कंपनीने म्हटलंय. त्यानुसार ९३.३ स्क्रीन-टू-बॉडी रेशो असलेला हा फोन आहे. (Redmi 13 5G)

(हेही वाचा – Maharashtra Administrative Tribunal : न्यायदान प्रक्रिया गतिमान करण्याचा प्रयत्न प्रशंसनीय – मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय)

लोकांना उत्सुकता असते ती फोनच्या कॅमेराची. या फोनमध्ये तीन कॅमेरा दिसत आहेत. आणि यातला प्राथमिक १०८ मेगापिक्सलचा असेल.

(हेही वाचा – Jammu and Kashmirमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; ५ जवान हुतात्मा, ६ जखमी)

या फोनचा प्रोसेसर हे फोनचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असणार आहे. स्नॅपड्रॅगन सातव्या पिढीचा भारतातील हा पहिला फोन असेल. आणि फोनच्या सगळ्यात वरच्या मॉडेलमध्ये १२ जीबीची रॅम उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण, विशेष म्हणजे ही रॅम फोनच्या स्टोरेजमधली जागा वापरून गरज पडल्यास वाढवता येईल. हे फिचर या फोनचा युएसपी असेल. (Redmi 13 5G)

फोनची बॅटरी क्षमताही चांगली आहे. आणि विशेष म्हणजे ३३ किलोवॅट टर्बो चार्जिंग सुविधेसह हा फोन उपलब्ध होणार आहे. म्हणजेच अगदी ३३ मिनिटांत हा फोन पूर्ण चार्ज होऊ शकेल. भारतात या फोनची किंमत १३,९९९ रुपयांपासून सुरू होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.