मोबाईलच्या सततच्या वापराने आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात आली. सर्व वयोगटातील माणसे मोबाईलच्या अतिवापराने शारीरिक समस्यांना सामोरे जात आहेत. आता मानसिक आरोग्यावरही परिणाम दिसून येत असून, निद्रानाश आणि एकांत या दोन प्रमुख समस्या रुग्णांमध्ये वाढत असल्याचे दिसून आले आहे.
कोरोनाकाळापासून या समस्येत वाढ होत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. सतत मोबाईल वापरत राहिल्याने लहान मुलांच्या स्मरणशक्तीवर तसेच डोळ्यांवर परिणाम होत आहे. गेल्या तीन वर्षांच्या काळात सहा ते दहा वयोगटातील बऱ्याच मुलांना चष्मा लागला आहे.
शाळा पुन्हा सुरु झाल्यानंतरही मुलांमध्ये एकाग्रता कमी दिसून येत असल्याची शिक्षकवर्गाकडून तक्रार आहे. प्रौढांमध्ये निद्रानाशाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माणसाला किमान आठ तासांची झोप आवश्यक असते. मात्र नोकरदार तसेच महाविद्यालयीन तरुण केवळ पाच तासांची झोप घेत असल्याने त्यांना वेगवेगळ्या शारीरिक आजारांचा सामना करावा लागत असल्याचे डॉक्टर सांगतात.
(हेही वाचा – मुंबईतील जोगेश्वरी येथून दोन संशयितांना अटक, आयएसआय एजंटच्या दोघे होते संपर्कात)
हे उपाय करून पहा
- झोपण्यापूर्वी तासभर अगोदर मोबाईल पाहू नका समाज माध्यमांवर विनाकारण वेळ घालवू नका.
- रात्री अंधारात मोबाईल पाहू नका.
- मोबाईलचा सतत वापर असल्यास दर तीन महिन्यांनी डॉक्टरांकडे डोळे तपासा.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community