-
ऋजुता लुकतुके
अनिल अंबानी हे रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू आहेत. एकेकाळी २००५ मध्ये त्यांनी रिलायन्स पॉवर या आपल्या समुहातील कंपनीचा आयपीओ बाजारात आणला होता. तेव्हा फक्त ५० सेकंदांत हा आयपीओ पूर्ण भरला गेल्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा झाला होता. या शेअरची नोंदणीही यथावकाश ५०० रुपये प्रती शेअर दराने भारतीय बाजारांमध्ये झाली. पण, तोच रिलायन्स पॉवर कंपनीचा शेअर सध्या ४० रुपयांवर आला आहे. एकेकाळी अंबानी कुटुंबातील स्टार व्यक्तिमत्त असलेली व्यक्ती म्हणून ओळख असलेल्या अनिल अंबानी यांच्या नंतरच्या प्रवासाचं वर्णन करणारीच ही वस्तुस्थिती आहे. (Reliance Power Anil Ambani)
भाऊ मुकेश अंबानीबरोबर झालेल्या वादानंतर रिलायन्स समहुचां विभाजन झालं आणि तेव्हा जगात सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत असलेले अनिल अंबानी २०२० मध्ये स्वत;ला दिवाळखोर जाहीर करून बसले आहेत. त्यांच्यावर एका कर्जामुळे तुरुंगात जाण्याची वेळ आलेली असताना मोठा भाऊ मुकेशने त्यांना सोडवलं होतं. (Reliance Power Anil Ambani)
(हेही वाचा – Champions Trophy Final 2025 : नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने स्विकारली फलंदाजी ! भारताची भिस्त गोलंदाजांवर)
असं असलं तरी अनिल अंबानी यांच्या समुहात असलेल्या रिलायन्स पॉवर, रिलायन्स कॅपिटल आणि अशा इतर कंपन्या आताही चांगली कामगिरी करत आहेत आणि खासकरून जय अनमोल या त्यांच्या मुलाने त्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी मोठी मदत केली आहे. जय अनमोलचं अलीकडेच त्याची मैत्रीण क्रिष्णा शाहशी लग्न झालं आहे. धीरुभाई अंबानी असताना अंबानी कुटुंबं राहायचं त्या सीविंड इमारतीतच हा सोहळा पार पडला होता. (Reliance Power Anil Ambani)
अनिल अंबानीही अनेक वर्षं याच घरात राहत होते. पण, त्यानंतर ते वांद्रे इथं पाली हिल परिसरात अबोड या आपल्या घरात राहायला गेले. ५०० कोटी रुपये मूल्य असलेलं त्याचं हे घर ७,००० वर्गफूटांचं आहे. याला १७ मजले आहेत आणि अनिल अंबानी आपली पत्नी टिना अंबानी आणि दोन मुलं जय अनमोल आणि जय अंशुल यांच्यासह इथं राहतात. २००० साली बीएसईएस ही कंपनी रिलायन्स पॉवरने अधिग्रहित केली. तेव्हा ही जागा रिलायन्स समुहाच्या ताब्यात आली होती. बीएसईएसचे तेव्हाचे अध्यक्ष या इमारतीत राहत होते. (Reliance Power Anil Ambani)
(हेही वाचा – Polycab Share Price : पॉलीकॅबच्या शेअरमध्ये गेल्या आठवड्यात घसरण का झाली?)
पण, अंबानी यांनी या जागेचा विकास करून अबोड नावाचे एक नंदनवन तिथं उभारलं आहे. ६६ मीटर उंचीची ही इमारत आहे. अनिल यांची आई कोकिलाबेन अंबानी येऊन जाऊन इथं राहतात. मुकेश अंबानींच्या अँटिलिया घराचं काम सुरू होतं, तेव्हा कोकिलाबेन अनिल अंबानी यांच्याबरोबर याच घरात राहत होत्या. (Reliance Power Anil Ambani)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community