-
ऋजुता लुकतुके
रिलायन्स समुहाने अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आपल्या तीन मुलांमध्ये उद्योगाची वाटणी केली तेव्हा जिओ हा टेलिकॉम आणि फायनान्स व्यवसाय हा आकाश अंबानीकडे आला. आणि रिलायन्स रिटेल उद्योग आकाशची जुळी बहीण ईशा अंबानीकडे आला आहे. जिओ फायनान्शिअल ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजमधून वेगळी झाली असली तरी रिलायन्स रिटेल्स अजूनही मुख्य कंपनीच्या अंतर्गतच काम करते. त्यामुळे रिलायन्स रिटेल हा रिलायन्स इंडस्ट्रीजचा भाग आहे. (Reliance Retail Share Price)
(हेही वाचा- Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकासाठी भारताला बोलावण्याचे पाकचे प्रयत्न सुरूच )
अलीकडेच रिलायन्स समुहाने १ एका शेअरमागे १ नवीन शेअर अशी बोनस शेअरची घोषणा केली आहे. तर रिलायन्स जिओला रिझर्व्ह बँकेकडून म्युच्युअल फंड कंपनी सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे रिलायन्स शेअर सध्या चर्चेत असलेला शेअर आहे. तर मूहूर्ताच्या ट्रेडिंगच्या वेळी रिलायन्सच्या बोनस शेअरचे पहिले सौदे पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे दिवाळीच्या दिवशीही हा शेअर चर्चेत असेल. शिवाय बोनस शेअरमुळे हा शेअर आता पुन्हा एकदा लोकांच्या अवाक्यातला झाला आहे. एकूणच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरवर पुढील आठवड्यात म्हणजे नवीन संवत्सरात सगळ्यांचं लक्ष असेल. मूहूर्ताच्या ट्रेडिंगमध्ये हा शेअर अर्ध्या टक्क्याने वर चढून १३३८ वर बंद झाला आहे. (Reliance Retail Share Price)
Insert screenshot
फक्त इतकंच नाही तर रिलायन्सच्या मीडिया उद्योगातही सकारात्मक बातम्या आहेत. रिलायन्स आणि हॉटस्टार डिस्नी यांच्यातील करार पूर्ण झाला असून आता ओटीटी माध्यमावरही आपल्याला त्यांचं बलाढ्य अस्तित्व दिसणार आहे. क्रिकेट प्रसारणाचे हक्क, फुटबॉल लीगचे हक्क आणि मनोरंजनातील काही तगडे कार्यक्रम आता जिओ हॉटस्टारवर बघायला मिळतील. त्यामुळेही रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर येणाऱ्या दिवसांत चर्चेत असतील. डिस्नी आणि रिलायन्समधील या कराराला आंतरराष्ट्रीय लवादांचीही मान्यता मिळाली आहे. (Reliance Retail Share Price)
(हेही वाचा- निवडणुक चिन्ह असलेले MNS चे ‘ते’ कंदील मुंबई महापालिकेने हटवले)
तर रिलायन्सच्या रिटेल व्यवसायाचाही विस्तार होत आहे. रिलायन्स मार्ट, आजिओ, नायका हे ब्रँड हे रिलायन्सच्या मालकीचे आहेत. आणि देशभरात त्यांचा विस्तार होताना दिसत आहे. (Reliance Retail Share Price)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community