- ऋजुता लुकतुके
गेल्यावर्षी ८ जुलैला अंबानी कुटुंबीयांची (Ambani family) फ्लॅगशीप कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने १,६०८ रुपयांचा उच्चांक प्रस्थापित केला होता. शेअरचं विभाजन झाल्यानंतरचा हा उच्चांक होता. आणि त्यानंतरचे काही दिवस शेअरसाठी साधारण असले तरी उच्चांकापासून आतापर्यंत ९ महिन्याच्या काळात रिलायन्सच्या शेअरमध्ये (Reliance Share Price) तब्बल २५ टक्क्यांची घसऱण झाली आहे. जागतिक बाजारातील अनिश्चिततेचं वातावरण हेच त्यामागे मुख्य कारण होतं. अगदी १,१५६ रुपयांचा नीच्चांकही कंपनीने याच कालावधीत नोंदवला. या घसरणीनंतर मागच्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर पडझडीतून सावरण्याचा प्रयत्न करताना दिसतो.
शेअरमध्ये झालेल्या घसरणीनंतर कंपनीचं भाग भांडवल हे तब्बल १५.४ लाख कोटी रुपयांनी घसरलं होतं. शेअरमधील वर्षभराच्या घडामोडी पाहायच्या झाल्यास, ८ जुलैला शेअरने १,६०५.९५ हा उच्चांक प्रस्थापित केला. तर यावर्षी ३ मार्चला कंपनीने १,१५६ अंशांचा नीच्चांकही गाठला. आणि फेब्रुवारी महिन्यातील ५ टक्के घसरणीनंतर आता मार्च महिन्याच्या पहिल्या ८ दिवसांत शेअरमध्ये ४ टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. शुक्रवारी शेअर बाजार (Stock market) बंद झाला तेव्हा रिलायन्स दिवसभरातील सगळ्यात यशस्वी शेअरपैकी एक होता. त्यात ३.०४ टक्क्यांची वाढ होऊन तो ३६ अंशांच्या वाढीसह १,२४६ अंशांवर बंद झाला. (Reliance Share Price)
(हेही वाचा – कल्याण मलंगगड येथे Bangladeshi Muslim infiltrators महिलांसह स्थानिकांना अटक)
शेअरची ९ महिन्यात पडझड होत असाताना संशोधन संस्थांनी मात्र गेले काही महिने या शेअरवर विश्वास दाखवला आहे. आताची पडझड ही खरेदीची संधी असल्याचं जागतिक संशोधन संस्थांनी (Global Research Institute) म्हटलं आहे. मॅक्वायरीने ७ मार्चला आपला शेअरवरील संशोधन अहवाल सादर करताना आधीचं न्यूट्रल रेटिंग वाढवून आऊटपरफॉर्म असं केलं आहे. म्हणजेच, हा शेअर नजीकच्या काळात वर जाईल अशी संस्थेला आशा आहे. त्यांनी रिलायन्स शेअरचं (Reliance Share Price) लक्ष्य वाढवून १,५०० रुपये इतकं केलं आहे.
(हेही वाचा – International Women’s Day : पुरुषांपाठोपाठ आता नोकऱ्यांमध्ये महिलांचा ‘टक्का’ वाढला; गतवर्षीच्या तुलनेत ४८ टक्के वाढ)
कोटक इक्विटीजनीही रिलायन्सला आधीचा ॲड हा शेरा वाढवून ते खरेदी करा असा केला आहे. पण, त्यांनी नजीकच्या काळात हा शेअर १,४०० रुपयांपर्यंत जाईल असा अंदाज वर्तवला आहे. दोन्ही संस्थांच्या अंदाजानुसार, २०२५ ते २०२७ या आर्थिक वर्षांमध्ये कंपनीची कामगिरी चांगली असेल आणि वार्षिक ताळेबंदामध्ये ती दिसून येईल. जेफरीज या आंतरराष्ट्रीय संस्थेनंही शेअरवर खरेदीचा सल्ला दिला आहे.
(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमपूर्ण आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या जबाबदारीवर ही गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट वाचकांना कुठल्याही शेअरवर खरेदी अथवा विक्रीचा सल्ला देत नाही)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community