सप्टेंबर नंतर क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे व्यवहार करण्यासाठी द्यावा लागणार ‘हा’ नंबर, RBI चा निर्णय

176

ऑनलाईन किंवा डिजिटल व्यवहारांसाठी बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. याद्वारे करण्यात येणा-या व्यवहारांच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून घेण्यात आला आहे.

या नव्या नियमांमुसार सप्टेंबर पासून व्यापारी,पेमेंट गेटवे ग्राहकांनी कार्डाद्वारे केलेल्या व्यवहरांचा तपशील साठवून ठेऊ शकणार नाहीत. त्यामुळे ग्राहकांना व्यवहार करताना प्रत्येक वेळी क्रेडिट आणि डेबिट कार्डचा तपशील भरावा लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः 7th Pay Commission: नवरात्रीतच सरकारी कर्मचा-यांची होणार दिवाळी? महागाई भत्ता वाढण्याची शक्यता)

कार्ड टोकनायझेशनचा नियम

रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून कार्ड टोकनायझेशन नियम लागू करण्यात आला आहे. त्यानुसार आता बँका आणि कार्ड नेटवर्क व्यतिरिक्त इतर कोणालाही कार्डाचा तपशील आपल्या डेटाबेसवर स्टोअर करता येणार नाही. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन,पॉइंट-ऑफ-सेल आणि अॅपच्या माध्यमातून वापरला जाणा-या क्रेडिट आणि डेबिट कार्डचा डेटा डिलीट करण्याचे निर्देश आरबीआयने दिले आहेत.

व्यवहार होणार अधिक सुरक्षित

कार्ड टोकनायझेशनमुळे आता क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे करण्यात येणा-या प्रत्येक व्यवहारांसाठी एक पर्यायी 16 आकडी कोड तयार करण्यात येतो. हा कोड टाकूनच आता कार्डांद्वारे व्यवहार करणे शक्य होणार आहे. यामुळे कार्डांद्वारे करण्यात येणारे व्यवहार हे अधिक सुरक्षित होणार आहेत. क्रेडिट आणि डेबिट कार्डशी संबंधित माहिती आता कोणाकडेही साठवली जाणार नाही.

(हेही वाचाः Google Chrome वापरणा-यांना सरकारने दिली धोक्याची सूचना, त्वरित करा हे काम)

ई-कॉमर्स वेबसाईट किंवा ग्राहकाला कार्ड पेमेंट टोकन तयार करावे लागेल किंवा प्रत्येक पेमेंटवेळी 16 आकडी कोड भरावा लागेल. यासाठी ई-कॉमर्स वेबसाईसह सर्व व्यापा-यांना बँकांशी स्वतंत्र करार करावा लागणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.