निवृत्त झालेला सचिन तेंडुलकर करतोय बागकाम!

93

सचिन रमेश तेंडुलकर हे नाव भारतात काय, तर जगभरात प्रसिद्ध आहे. सचिन तेंडुलकरने आपला काळ गाजवला आणि एक मराठमोळा मुलगा जगात झळकला. सचिन तेंडुलकरला भारतरत्न देऊन सरकारने सन्मानित केलं आहे. महत्वाचं म्हणजे हा पुरस्कार मिळवणारा तो पहिला खेळाडू आहे. तसेच राजीव गांधी पुरस्काराने देखील त्याला सन्मानित करण्यात आले आहे. २००८ मध्ये त्याला पद्म विभूषण पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. असा हा सर्वांचा लाडका सचिन…

( हेही वाचा : म्हाडा टेंडर प्रकरण : कंत्राटदारावर गोळीबार करणाऱ्या ४ हल्लेखोरांना अटक )

स्टेडियममध्ये बॅटिंग करताना सचिन सचिन, सचिन सचिन अशी दाद प्रेक्षक त्याला द्यायचे. आता सचिन निवृत्त झाला आहे. त्याच्या मुलाने क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. सचिनच्या चाहत्यांना प्रश्न पडत असतो की, आता सचिन तेंडुलकर काय करतो? ज्याला लोक क्रिकेटचा देव मानतात, असा सचिन तेंडुलकर निवृत्त झाल्यानंतर आपला वेळ कसा घालवत असेल? सचिनने आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सचिन पालेभाज्यांची कापणी करतोय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतीची आवड आहे हे आपल्या सर्वांना माहितच आहे. त्याचप्रमाणे सचिन तेंडुलकरला बागकामाची आवड आहे. सचिन तेंडुलकर काय करतो याविषयीचे अपडेट्स मिळवायचे असतील तर तुम्ही त्याचे इंस्टाग्राम अकाउंट पाहिले पाहिजे. इंस्टावर सचिन खूप सक्रिय असतो. इंस्टावर भाज्या कापणी करतानाचा व्हिडिओ पोस्ट करत त्याने कॅप्शन दिलंय की, “इन सब्जियों के नाम इस्तेमाल करके आप कितने वाक्य बना सकते हैं? मैंने बनाया- उम्मीद है कि भारतीय बल्लेबाज दूसरी टीमों के गेंदबाजों का भरता बनाते रहें।”

त्याच्या या पोस्टवर अनेक गंमतीदार कमेंट्स आल्या आहेत. महत्वाचं म्हणजे सचिन तेंडुलकर आपल्या चाहत्यांना शेतीबद्दल टिप्स देखील दिल्या आहेत. त्याने आपल्या अंगणात वांगी, मूळा, पालक आणि इतर भाज्या लावल्या आहेत. त्याच्या घरात याच भाज्यांचा वापर होतो. हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. मास्तर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बागकाम करताना पाहुन चाहते भलतेच खुश झाले आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.