retirement wishes : तुमचे प्रियजन निवृत्त होत आहेत? मग त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करुन त्यांना द्या अनोखं गिफ्ट!

38
retirement wishes : तुमचे प्रियजन निवृत्त होत आहेत? मग त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करुन त्यांना द्या अनोखं गिफ्ट!

निवृत्ती हा कारकिर्दीचा शेवटचा टप्पा असतो. म्हणजेच जी व्यक्ती निवृत्त होत असते तिचा व्यावसायिक प्रवास संपत आलेला असतो. म्हणूनच निवृत्त होणाऱ्या व्यक्तीला शुभेच्छा देऊन, त्यांच्या चांगल्या कामांना आणि आठवणींना उजाळा दिला जातो. निवृत्तीनंतर या आठवणी कायम त्यांच्या सोबतच राहतात. म्हणूनच त्यांना शुभेच्छा देताना त्यांनी केलेल्या कामाचं प्रामाणिकपणे कौतुक केलं, त्यांचं अभिनंदन केलं तर त्यांनाही नक्कीच बरं वाटेल. आपल्या सहकाऱ्यांसाठी निवृत्तीचे शुभेच्छा संदेश तयार करताना निवृत्त होणाऱ्या व्यक्तीच्या कामाची कदर करायला हवी. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यासोबतच्या आठवणींवर विचार करण्याची संधी म्हणून त्यांच्यासाठी निवृत्तीचे शुभेच्छा संदेश तयार करू शकता. (retirement wishes)

निवृत्तीचे शुभेच्छा संदेश देताना त्या संदेशात अभिनंदनाचा सूर असायला हवा. कारण निवृत्ती म्हणजे एका दीर्घ कारकिर्दीचा उत्सव असतो. तुम्ही दिलेल्या निवृत्तीच्या शुभेच्छा तुमच्या निवृत्ती घेणाऱ्या सहकाऱ्यांचं त्यांनी वर्षानुवर्षं केलेल्या चांगल्या कामाबद्दल कौतुक करणाऱ्या असाव्यात. एवढंच नाही तर त्यांना तुमचे शुभेच्छा संदेश हे त्यांच्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्याच्या आनंद घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणारे असायला हवेत. पण तुम्हाला जर का शब्दांची जुळवाजुळव करायला कठीण जात असेल तर, असेच काही निवृत्तीचे शुभेच्छा संदेश आम्ही आजच्या लेखात तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहुयात… (retirement wishes)

(हेही वाचा – radhanagari dam : राधानगरी धरण; एका धरणाने बदलला कोल्हापूरच्या शेतीचा इतिहास!)

शुभेच्छा देताना निवृत्त व्यक्तींच्या कामगिरीवर प्रकाश टाका

निवृत्त व्यक्तीच्या कारकिर्दीमध्ये त्यांना अनेकदा शाबासकी आणि अवॉर्ड मिळाले असतील. तर तुम्ही दिलेल्या शुभेच्छांमध्ये तुमच्या सहकाऱ्यांच्या कारकिर्दीतल्या कामगिरीवर तुम्ही प्रकाश टाकला पाहिजे. कारण त्यांनी अंतिम कारकिर्दीचा टप्पा गाठला आहे. (retirement wishes)

निवृत्त होणाऱ्या सहकाऱ्यांसाठी निवृत्तीच्या शुभेच्छा : 
  • तुमच्या निवृत्तीबद्दल अभिनंदन! तुमच्यासाठी खूप आनंद वाटत आहे.
  • तुमच्या निवृत्तीबद्दल मनापासून अभिनंदन…
    आता तुम्ही स्वतःसाठी वेळ देऊन आपलं आयुष्य एन्जॉय करा..
  • तुमच्या उत्कृष्ट कारकिर्दीबद्दल अभिनंदन आणि तुमच्या निवृत्तीसाठी शुभेच्छा!
  • आज तुम्ही निवृत्त होत आहात, मी तुमच्यासाठी खूप आनंदी आहे. तुम्हाला निवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा!!
  • निवृत्तीनिमित्त खूप शुभेच्छा! मला आशा आहे की तुम्ही तुमच्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्याल…
  • मला तुमच्यासोबत काम करायला मिळाल्याने मी किती आनंदी आहे, हे शब्दात वर्णन करता येत नाही. मला तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. तुम्हाला निवृत्तीच्या शुभेच्छा!!
  • तुमच्या निवृत्तीने तुमचं काम करणं थांबवलं तरी आपली मैत्री कधीच थांबणार नाही.. लवकरच पुन्हा भेटू ही इच्छा,
    निवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा!!
  • निवृत्तीमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या गोष्टी आणि छंद जोपासण्याची संधी मिळेल अशी माझी इच्छा आहे. तुमचं खूप अभिनंदन आणि भविष्यात येणाऱ्या आनंदाच्या शुभेच्छा… (retirement wishes)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.