बॉलिवूडची नशेमन नशेबाज!

135

बॉलिवूड, पार्टी आणि ड्रग्स हे काही नवे नाही. अनेकदा नशेत धुंद असलेल्या बॉलिवूडच्या कलाकारांचे व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल झाल्याचे देखील आपण पाहिले असालच. आता मात्र पुन्हा एकदा बॉलिवूडच्या ड्रग्स कनेक्शनचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आले आणि या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक देखील झाली. हे प्रकरण इथेच थांबले नाही तर आता ड्रग्स प्रकरणी बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांची नावे समोर येऊ लागली आहेत.  

रियाने घेतले ‘सारा’ चे नाव 

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने ड्रग्स कनेक्शनमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला बॉलिवूडमधील २५ कलाकारांची यादी दिली असून, यामध्ये तिने सैफ अली खानची मुलगी आणि अभिनेत्री सारा अली खान हिचे नाव घेतल्याची माहिती समोर आली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रियाने अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांची देखील नावे घेतल्याची माहिती मिळत आहे. रियाने एनसीबीला दिलेल्या १९ पानी निवेदनात सारा, रकुल आणि सिमॉन या तिघींची नावे दिली आहेत. एनसीबी आता फिल्म इंडस्ट्रीच्या ए, बी आणि सी ग्रेड कलाकारांवर लक्ष केंद्रीत करत आहे, जे अमली पदार्थांचे सेवन करतात. या प्रकरणात २५  ए ग्रेड बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे घेण्यात आली आहेत, ज्यात अभिनेते, दिग्दर्शक, कास्टिंग डायरेक्टर, प्रॉडक्शन हाऊस आणि इतरांचा समावेश आहे.

सारा अली खानने सुशांतसिंह राजपूत याच्यासोबत ‘केदारनाथ’ चित्रपटात काम केले होते. सारा ही सुशांतला आपला मार्गदर्शक मानत असल्याचेही म्हटले जात होते. सुशांतच्या मृत्यूनंतर तिने सोशल मीडियावर भावूक पोस्टही शेअर केली होती. ‘सिम्बा’ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या साराने मोजक्याच चित्रपटात भूमिका केल्या आहेत. तर अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिने अनेक दाक्षिणात्य सिनेमात भूमिका केल्या आहेत. ‘अय्यारी’ सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. तर अजय देवगनसोबत दे दे प्यार दे, मरजांवा असे काही चित्रपट केले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.