सध्या देशभरात महागाईने उच्चांक गाठला असून पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. सोने-चांदी, दूध, साबण, इंधन, मसाल्याच्या पदार्थांसह अनेक वस्तूंचे भाव वधारले आहेत. आता डाळींच्या किंमतीत सुद्धा १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ उपक्रम; कोणतेही बिल भरा आपल्याच दारी! )
डाळींच्या दरात १६ टक्क्यांची वाढ
मागील जवळपास एका महिन्यात डाळींच्या दरात १६ टक्क्यांची वाढ झाली आहे. डाळ, भाज्या, फळांसह अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. सध्या तूर डाळीचे भाव १२५ रुपये किलो, तर सर्वात स्वस्त चणाडाळ ८० रुपये किलोने विकली जात आहे. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटकात तूर डाळीची विक्री ६ हजार ४०० ते ६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दराने होत आहे.
विश्लेषक हरीश सेठ यांच्या मते, अलिकडच्या वर्षांत डाळींच्या किमती जवळपास स्थिर आहेत. उलट कापसाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी यंदा कापसाची लागवड वाढवली आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये तूर आणि उडदाच्या लागवडीत २५ ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे डाळींचे भाव वाढले आहेत.
Join Our WhatsApp Community