भाजलेल्या चण्यांमध्ये (Roasted Chickpeas) प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. घर, कार्यालय किंवा प्रवासात कुठेही सहज खाता येण्यासारखा हा पदार्थ आहे. आहारातला एक हेल्दी ऑप्शनही आहे. भाजलेले चणे खाल्ल्याने भूक वजनवाढीवर नियंत्रण राहते. या चण्यांमध्ये जीवनसत्त्वे, मिनरल्स, प्रोटिन्स, फायबर्स अशी शरीराला पोषक तत्त्वे असतात. जाणून घेऊया रोज मूठभर भाजलेले चणे खाल्ल्याने शरीराला कोणते आरोग्यदायी फायदे होतात.
शरीरातील पोषक तत्त्वांची कमतरता भरून काढण्यासाठी भाजलेले चणे खावेत. चण्यांमध्ये फायबर्स, प्रथिने असल्यामुळे भूक नियंत्रणात राहायला मदत होते. यामुळे अन्न पचण्यास मदत होते.
चण्यांमध्ये अँण्टी ऑक्सिडंट्स आणि फायटोन्युट्रिएंटस असतात. काळ्या चण्यांमधील पोषक तत्त्वांमुळे रक्तातील गुठळ्या होण्यापासून रक्षण होते. ह्रदयाचे आरोग्य चांगले राहते.
(हेही वाचा – Mumbai University Senate Election :आशिष शेलारांचे आरोप समितीला मान्य नाही, मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक लवकरच होणार?)
भाजलेल्या चण्यांमध्ये स्टेरोल नावाचे अँण्टीऑक्सिडंट्स असतात. यामुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते.
चण्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. शरीरातील नवीन पेशीनिर्मितीसाठी प्रथिनांची आवश्यकता असते. यामुळे लहान मुलं, गरोदर महिला आणि तरुणांनी चणे खाणे त्यांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते.
– हाडांच्या मजबुतीसाठी भाजलेले चणे खावेत, कारण चण्यांमध्ये मँगनीज आणि फॉस्फरस असते. यामुळे सांधेदुखी टळू शकते.
– साखरेचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी चणे खावेत. मधल्या वेळेत भूक लागल्यानंतर चणे खाणे हा उत्तम पर्याय आहे. चण्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे मधुमेही रुग्णांना चणे खाणे फायदेशीर ठरते.
Join Our WhatsApp Community