-
ऋजुता लुकतुके
ख्रिस्तियानो रोनाल्डोचा फुटबॉल मैदानावरील करिश्मा सगळ्यांनाच ठाऊक आहे. अलीकडेच त्याने आपला ९०० वा गोल साकार केला आहे. आणि मैदानावरील त्याची ही हुकुमत त्याला सगळ्यात श्रीमंत फुटबॉलपटूंपैकी एक बनवते. २०२० मध्येच त्याची फुटबॉलमधून एकूण कमाई ही १ अब्ज अमेरिकन डॉलरच्या वर पोहोचली होती. आणि ही कामगिरी करणारा सांघिक खेळ खेळणारा तो एकमेव सक्रिय खेळाडू होता. (Ronaldo Net Worth)
(हेही वाचा- Bomb Threat Flight : विमानात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेच्या प्रकरणी आयबी अधिकाऱ्याला अटक)
पोर्तुगाल हा त्याचा राष्ट्रीय संघ. आणि सध्या तो अल नासर या दुबईतील क्लब संघाकडून खेळतो. क्लब फुटबॉलमधून त्याला दरवर्षी मिळणारी कराराची रक्कम आणि सोबतीला करोडो रुपयांचे जाहिरातींचे करार तसंच सीआर७ ही त्याची कपड्यांची ब्रँड फ्रँचाईजी यातून रोनाल्डोची मुख्य कमाई होते. (Ronaldo Net Worth)
सध्या रोनाल्डोची वार्षिक मिळकतच १०० ते १५० दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी आहे. यातील ७० टक्के रक्कम त्याला क्लबकडून पगाराच्या रुपात मिळते. तर उर्वरित रक्कम ही जाहिरातींतून मिळते. नाईकी, हर्बालाईफ अशा जागतिक ब्रँडचा तो अँबेसिडर आहे. फुटबॉल जगतात सर्वकालीन सर्वोत्तम फुटबॉलपटूंच्या यादीत पेले, मॅराडोना, जॉर्ज बेस्ट आणि लियोनेल मेस्सी यांच्या बरोबरीने रोनाल्डोचं नाव घेतलं जातं. पण, मैदानावरील गोल आणि मैदानाबाहेरील मिळकत या बाबतीत त्याने इतरांना मागे टाकलं आहे. निवृत्तीपर्यंत त्याची मिळकत ही २ अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात असेल असा अंदाज आहे. आणि ही कामगिरी करणारा तो एकमेव सांघिक खेळाडू तर असेलच. शिवाय मायकेल शूमाकर, फ्लॉईड मेवेदर, जॅक निकोलस, आरनल्ड पाल्मर, टायगर वूड्स आणि मायकेल जॉर्डन यांच्या यादीत तो जाऊन बसेल. (Ronaldo Net Worth)
(हेही वाचा- Military Voluntary Retirement : केंद्र सरकारची राज्यसभेत धक्कादायक माहिती; ५५ हजार जवानांची ‘स्वेच्छानिवृत्ती’)
त्याची कमाई पाहूया,
-
क्लबशी केलेला करार २०० दशलक्ष अमेरिकन डॉलर
-
एकेका जाहिरातीसाठी वार्षिक १५० दशलक्ष अमेरिकन डॉलर
-
नाईकी कंपनीबरोबरचा त्याचा आयुष्यभराचा करार १ अब्ज अमेरिकन डॉलरचा
-
सौदी फुटबॉल संघाबरोबर ३ वर्षांचा करार ६०० दशलक्ष अमेरिकन डॉलरचा
रोनाल्डोची जीवनशैलीही आधुनिक आणि ऐषोरामाची आहे. पोर्तुगालमधील त्याच्या मूळ गावी मदेरा इथं त्याचं २० दशलक्ष अमेरिकन डॉलर किमतीचं आलिशान घर आहे. याशिवाय जगभरात त्याच्या अनेक मालमत्ता आहेत. पोर्तुगालमधील त्याच्या घरात ३० गाड्या मावतील इतकं मोठं गॅरेज आहे. फेरारी, बुगाटी आणि लँबोर्गिनी हे त्याचे आवडते गाड्यांचे ब्रँड आहेत. तर रोनाल्डोला खरा शौक आहे तो घड्याळांचा. विविध रत्न आणि खासकरून काळे हिरे असलेली मौल्यवान घड्याळं रोनाल्डोकडे आहेत. शिवाय त्याचं खाजगी जेट आणि आलिशान यॉट या त्याच्याकडे असलेल्या सगळ्यात महागड्या गोष्टी आहेत. त्याच्या खाजगी जेटची किंमतच ६० दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी आहे. (Ronaldo Net Worth)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community