वाचकहो, दरवर्षी ७ फेब्रुवारी रोजी Rose day साजरा केला जातो. खरं पाहता यास व्हॅलेंटाईन वीक देखील म्हणतात. रोझ डे हा या आठवड्याचा पहिला दिवस असतो. या दिवशी जोडपे एकमेकांना, मित्रांना आणि नातेवाईकांना त्यांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी गुलाब देतात.
तुम्हाला माहिती असेलच की गुलाब हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. कुणाला मनातल्या भावना सांगायच्या असतील तर प्रत्येक वेळी शब्द खर्ची न घालता तुम्ही गुलाब देऊनही व्यक्त होऊ शकता. गुलाब दिन हा केवळ जोडप्यांसाठीच नव्हे तर तो मैत्री, सुसंवाद आणि शांतीचे प्रतीक देखील आहे. तुम्ही तुमच्या बायकोलाही गुलाब देऊन आपलं प्रेम व्यक्त करु शकता.
खरंतर बायको किंवा पत्नी ही आपल्या आयुष्यभराची साथीदार, जोडीदार असते. पण कामाच्या व्यापात तिच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी खास शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, हे संदेश तुम्ही तुमच्या पत्नीला पाठवून तुमच्या मनातील प्रेम भावना व्यक्त करु शकता. (Rose Day)
(हेही वाचा – हिंदू म्हणून कुणी हाक मारायची वाट बघू नका; झाराप येथील घटनेनंतर आमदार Nilesh Rane यांचे हिंदूंना आवाहन)
१.
तू एक सुंदर स्वप्न आहेस,
हृदयस्पर्शी भावना आहेस
तुला मी काय गुलाब देऊ
तू स्वतःच गुलाब आहेस.
Happy Rose Day
२.
असा एकही क्षण आयुष्यात कधीच येऊ नये
तुझ्याशिवाय जगण्याचा पर्याय, कधीच येऊ नये
माझ्या प्रिय पत्नीला गुलाब दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
३.
प्रेमाच्या पाकळ्यांनी बांधलेले गुलाब सुंदर आहे.
त्यामध्ये जपून आणलेले ह्रदय हे माझे आहे
Happy Rose Day
४.
रोझ डे निमित्त तुझ्यासाठी गुलाब पाठवलं आहे
तुझ्या ओठांचा स्पर्श करुन त्यात जीवन भर ना!
Happy Rose Day Wife
५.
जग जरी फिरुन आलो तरी
तुझ्यासारखी जगात कुणीच सापडणार नाही
तुझ्यामुळेच जीवनाला अर्थ आहे
खरं सांगतो तुझ्याशिवाय हे ह्रदयही धडधडत नाही
Happy Rose Day Sweetheart! (Rose Day)
(हेही वाचा – lata mangeshkar song : लता मंगेशकर यांची कोणती १० गाणी सर्वात प्रसिद्ध आहेत?)
६.
तुझ्या ओठांचा गुलाब नेहमीच फुलत राहो.
तुझ्यापासून दुःख दूर पळत राहो
शेवटपर्यंत मी तुझ्यासोबत असेन
या शरीरात प्राण राहो न राहो…
गुलाब दिनाच्या शुभेच्छा
७.
तुझं आणि माझं प्रेम किती जुनं झालं
कितीतरी ऋतू आपण एकत्र पाहिले
वय वाढत गेलं आणि प्रेमही वाढत गेलं
एकमेकांवर दुःखातही आपण फुल वाहिले
८.
ते गुलाब नाहीये.
आपल्या प्रेमाचे प्रतीक आहे,
संभाळून ठेव हे फुल
ही आपल्या प्रेमाची कहाणी आहे
गुलाब दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! (Rose Day)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community