Royal Enfield Classic 350 Bobber : भारताला प्रतीक्षा रॉयल एनफिल्डच्या क्लासिक ३५० बॉबरची

Royal Enfield Classic 350 Bobber : यंदा कंपनीला आपल्या ३५० सीसी बाईकचा विस्तार करायचा आहे.

39
Royal Enfield Classic 350 Bobber : भारताला प्रतीक्षा रॉयल एनफिल्डच्या क्लासिक ३५० बॉबरची
  • ऋजुता लुकतुके

२०२५ हे वर्ष दुचाकींच्या इतिहासात रॉयल एनफिल्ड या प्रिमिअर श्रेणीतील बाईकचं आहे. गेल्यावर्षी सुरुवातीलाच कंपनीने शॉटगन ६५० बाईक लाँच केली. आता कंपनीची तयारी सुरू आहे ती ३५० सीसी क्षमतेच्या बाईकच्या विस्ताराची. यासाठी ते ३५० सीसी क्लासिक बाईकचं नुतनीकरण करत आहेत. याच श्रेणीत कंपनीची नवीन ३५० सीसी बॉबर ही बाईक जून महिन्यात भारतात लाँच होण्याच्या तयारीत आहे. भारतातच चेन्नई इथं या बाईकचं उत्पादनही सुरू झालंय.

कंपनीची ही रेट्रो स्टाईल बाईक क्लासिक श्रेणीत आधीपासूनच लोकप्रिय आहे. आता कंपनीला ती थोडी अत्याधुनिक बनवायची आहे. त्यामुळे क्लासिकपेक्षा ती थोडी ट्रेंडी आणि किमतीने जास्त महाग असेल हे स्पष्टच आहे. मिटिओर ३५० शी ती मिळतीजुळती असेल. (Royal Enfield Classic 350 Bobber)

पारंपरिक आरई ३५० क्लासिक बाईकचं जुनं रेट्रो चित्र अजूनही लोक विसरलेले नाहीत. त्यामुळे तो लुक कंपनीने कायम ठेवलाय. २०१७ मध्ये क्लासिक लाँच झाली तेव्हाचा एक फोटो बघूया,

(हेही वाचा – प्रधानमंत्री आवास योजना पालिकांना सक्तीची करा; खासदार Naresh Mhaske यांची संसदेत मागणी)

हा लुक ही मॉडेलची ओळख आहे आणि ती कंपनीला बदलायची नाही. फक्त नवीन बाईक ही दोन प्रवाशी बसतील अशी असेल. पण, गरज नसेल तर दुसरी सीट काढूनही टाकता येईल. या गाडीत जुनंच ३४९ सीसी क्षमतेचं जे सीरिजचं इंजिन असेल. सिंगल सिलिंडर मोटार असलेलं हे इंजिन २०.२ बीएचपी इतकी शक्ती निर्माण करू शकतं. गाडीत ५ स्पीड गिअर-बॉक्स असेल आणि क्रॅश गार्डही बसवण्यात आलं आहे.

रॉयल एनफिल्डच्या क्लासिक बॉबरला बाजारात थेट स्पर्धा नाही. त्यामुळे ही बाईक दणक्यात एंट्री घेईल आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेईल हे नक्की आहे. दोन लाख रुपयांपासून ही बाईक भारतात उपलब्ध होईल. (Royal Enfield Classic 350 Bobber)

(हेही वाचा – मुंबई-नाशिक महामार्गावरील Kasara Ghat पुढील ६ दिवस दोन टप्प्यात राहणार बंद)

रॉयल एनफिल्ड ही भारतीय बाजारातील सगळ्यात जुनी मोटारसायकल आहे. १९५२ मध्ये भारतीय सैन्याला सीमारेषेवर गस्तीसाठी तगडी मोटारबाईक हवी म्हणून केंद्रानेच रॉयल एनफिल्डला पसंती दिली आणि अशा ८०० मोटरसाईकल भारतात आयात केल्या होत्या. मूळची ब्रिटिश कंपनी असलेल्या रॉयल एनफिल्डला हळू हळू भारतात कारखाना स्थापन करण्याची परवानगीही मिळाली. कंपनीची बुलेट ही मोटरसायकल भारतीय रस्त्यांवर विशेष लोकप्रिय होती.

रिडिचने भारतीय कंपनी मद्रास ऑटोशी करार करून भारतात उत्पादन पहिल्यांदा सुरू केलं. चेन्नईमध्येच या कंपनीचा मोठा कारखाना आहे आणि १९९० मध्ये आयशर मोटर्सने ही कंपनी विकत घेतल्यापासून कंपनीत मोठे बदल झाले आहेत. पारंपरिक रॉयल एनफिल्ड बाईक आता आधुनिक झाली आहे. रॉयल एनफिल्ड कंपनीची ब्रँड ओळख जपण्यासाठी एकाही कंपनीने तिचं नाव बदलेलं नाही. (Royal Enfield Classic 350 Bobber)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.