- ऋजुता लुकतुके
२०२४ हे वर्ष दुचाकींच्या इतिहासात रॉयल एनफिल्ड या प्रिमिअर श्रेणीतील बाईकचं आहे. कारण, वर्षाच्या सुरुवातीलाच कंपनीने शॉटगन ६५० बाईक लाँच केली. आता कंपनीची तयारी सुरू आहे ती ३५० सीसी क्षमतेच्या बाईकच्या विस्ताराची. यासाठी ते ३५० सीसी क्लासिक बाईकचं नुतनीकरण करत आहेत. याच श्रेणीत कंपनीची नवीन ३५० सीसी बॉबर ही बाईक जून महिन्यात भारतात लाँच होण्याच्या तयारीत आहे. भारतातच चेन्नई इथं या बाईकचं उत्पादनही सुरू झालंय. (Royal Enfield Classic 350 Bobber)
कंपनची ही रेट्रो स्टाईल बाईक क्लासिक श्रेणीत आधीपासूनच लोकप्रिय आहे. आता कंपनीला ती थोडी अत्याधुनिक बनवायची आहे. त्यामुळे क्लासिकपेक्षा ती थोडी ट्रेंडी आणि किमतीने जास्त महाग असेल हे स्पष्टच आहे. मिटिओर ३५० शी ती मिळतीजुळती असेल. पारंपरिक आरई ३५० क्लासिक बाईकचं जुनं रेट्रो चित्र अजूनही लोक विसरलेले नाहीत. त्यामुळे तो लुक कंपनीने कायम ठेवलाय. २०१७ मध्ये क्लासिक लाँच झाली तेव्हाचा एक फोटो बघूया, (Royal Enfield Classic 350 Bobber)
Cillus Custom Made Royal Enfield Classic 350 Bobber https://t.co/Ae1Q0pNx8z pic.twitter.com/hkx2UE2Ai1
— Modified Bullets (@ModifiedBullets) November 10, 2017
(हेही वाचा – Breast Cancer Awareness : ‘थँक्स अ डॉट’ कार्यक्रमाद्वारे महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाविषयी जागृती)
इतक्या रुपयांपासून ही बाईक भारतात उपलब्ध
हा लुक ही मॉडेलची ओळख आहे. आणि ती कंपनीला बदलायची नाही. फक्त नवीन बाईक ही दोन प्रवाशी बसतील अशी असेल. पण, गरज नसेल तर दुसरी सीट काढूनही टाकता येईल. या गाडीत जुनंच ३४९ सीसी क्षमतेचं जे सीरिजचं इंजिन असेल. सिंगल सिलिंडर मोटार असलेलं हे इंजिन २०.२ बीएचपी इतकी शक्ती निर्माण करू शकतं. गाडीत ५ स्पीड गिअर-बॉक्स असेल. आणि क्रॅश गार्डही बसवण्यात आलं आहे. (Royal Enfield Classic 350 Bobber)
रॉयल एनफिल्डच्या क्लासिक बॉबरला बाजारात थेट स्पर्धा नाही. त्यामुळे ही बाईक दणक्यात एंट्री घेईल. आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेईल हे नक्की आहे. दोन लाख रुपयांपासून ही बाईक भारतात उपलब्ध होईल. (Royal Enfield Classic 350 Bobber)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community