‘पधारो म्हारे देश’ ९ दिवस राजस्थानची सफर! भारतीय रेल्वेचे रॉयल पॅकेज; कसा असेल प्रवास किती होईल खर्च?

राजस्थान फिरायचा योग्य कालावधी म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी या वेळेत बहुसंख्य पर्यटक विविध ठिकाणी फिराण्याचे नियोजन करतात. भारतीय रेल्वेमार्फत पर्यटकांसाठी रॉयल राजस्थान या विशेष पॅकेजचे नियोजन करण्यात आले आहे.

( हेही वाचा : T20 World Cup : भारताच्या पराभवानंतर सचिनची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, पराभव सुद्धा…)

या पॅकेज अंतर्गत पर्यटक ८ रात्री आणि ९ दिवसांसाठी राजस्ठान फिरू शकतात. ऐतिहासिक वारसा, नैसर्गिक सौंदर्य आणि कलात्मकतेचा आशीर्वाद असणाऱ्या राजस्थानमध्ये जाण्यासाठी IRCTC ने विशेष पॅकेज बनवले आहे. याअंतर्गत तुम्ही बिकानेर, जयपूर, जैसलमेर, जोधपूर, उदयपूर या ठिकाणांना भेट देऊ शकता.

तुम्ही लोककला, राजस्थानची खाद्यसंस्कृती, वाळवंटी प्रदेशातील राहणीमान अशा बऱ्याच नवनव्या गोष्टी अनुभवण्याची संधी भारतीय रेल्वेच्या पॅकेजमधून तुम्हाला मिळणार आहे.

कसा असेल प्रवास किती होईल खर्च?

भारतीय रेल्वे म्हणजेच IRCTC अंतर्गत असणाऱ्या या पॅकेजमध्ये विमान प्रवासी तिकीटे, राजस्थानमध्ये रेल्वे एसी कोचने प्रवास, प्रेक्षणीय स्थळांना भेट, तेथील खाद्यसंस्कृतीचा आनंद, डिलक्स हॉटेलमध्ये मुक्काम, सिटी टूर्सचा खर्च याचा यात समावेश असणार आहे. या पॅकेजची माहिती देणारं ट्वीट रेल्वेकडून करण्यात आले आहे. यासाठी माणसी ४० हजार ७०० रुपये इतका खर्च येणार आहे. सविस्तर माहितीसाठी तुम्ही IRCTC च्या संकेतस्थळाला भेट द्या.

कधीही न पाहिलेल्या ठिकाणांना द्या भेट

हवा महल, सिटी पॅलेस, जंतर मंतर, आमेर किल्ला, बिर्ला मंदिर, जलमहल, करणी माता मंदिर, जुनागढ किल्ला, जयगढ किल्ला, मेहरानगढ

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here