जगातल्या सर्वात सुरक्षित शहरांमध्ये भारतातील ‘या’ शहरांचा समावेश

184

द इकोनॉमिस्ट इंटेलिजेंस युनिटने आपल्या अभ्यासात जगातील 60 सुरक्षित शहरांची यादी दिली आहे. यामध्ये भारताची राजधानी नवी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई या दोन प्रमुख शहरांचाही समावेश आहे. तर डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन जगातील पहिल्या क्रमांकाच सुरक्षित शहर आहे. या सूचीत टोरंटो दूस-या तर सिंगापूर तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताची राजधानी नवी दिल्ली 48व्या क्रमांकावर, तर मुंबई शहर 50व्या स्ठानावर आहे.

जगातील टॅाप 10 सुरक्षित शहरं

द इकोनॉमिस्ट इंटेलिजेंस युनिट (EIU)द्वारे जारी केलेल्या यादीतील पहिली 10 शहरं-

  1. कोपनहेगन
  2. टोरंटो
  3. सिंगापूर
  4. सिडनी
  5. टोकियो
  6. एम्स्टर्डम (आम्सटरडॅम)
  7. वेलिंग्टन
  8. हॅांगकॅांग
  9. मेलबर्न
  10. स्टॅाकहोम

(हेही वाचाः भारत बनले जगातील दुसरे आकर्षक उत्पादन केंद्र… अमेरिकेला टाकले मागे)

हे आहेत मापदंड

जगातील सुरक्षित शहरांची यादी तयार करण्यासाठी EIU ने 76 मापदंडांच्या आधारे 60 सुरक्षित शहरांची नावे दिली आहेत. या मापदंडांमध्ये डिजिटल, हेल्थ, इन्फ्रास्ट्रक्चर, पर्सनल आणि एनवायरमेंट सिक्योरिटींचा समावेश आहे. या पाचही मापदंडांनुसार, प्रत्येक शहराला १०० पैकी गुण दिले गेले आहेत.

भारताचे स्थान

इआययूच्या यादीमध्ये भारतातील दोन शहरांची नावे आहेत. 48व्या क्रमांकावर राजधानी नवी दिल्ली आणि 50व्या स्ठानावर मुंबई या सुरक्षित शहरांचा समावेश आहे. इकोनॉमिस्ट ग्रुपचं रिसर्च आणि एनालिसिस डिव्हिजन आहे, जो अनेक विषयांवर रिसर्च करतो. त्याची स्थापना 1946 मध्ये झाली. ईआययूचं मुख्यालय लंडनमध्ये आहे.

(हेही वाचाः धोक्याची घंटा! राज्यात डेल्टा प्लसचे आढळले ‘इतके’ नवीन रुग्ण!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.