Salaulim Dam : या ५ कारणांसाठी गोव्यातील सलौलीम डॅमला नक्की भेट द्या

222
Salaulim Dam : या ५ कारणांसाठी गोव्यातील सलौलीम डॅमला नक्की भेट द्या

गोवा हे जगभरातल्या पर्यटकांसाठी अत्यंत खासमखास आहे. पण अनेकांचा असा गैरसमज आहे की गोव्याला जायचं म्हणजे फक्त समुद्रकिनारा पाहायचा. तर असं मुळीच नाही. गोव्याचा समुद्रकिराना अर्थातच खूप प्रसिद्ध आहे. मात्र गोव्यातील इतर ठिकाणे देखील अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यापैकी सलौलीम धरण (Salaulim Dam) हे देखील दक्षिण गोव्यातील एक अतिशय सुंदर ठिकाण आहे.

या ५ कारणांसाठी सलौलीम डॅमला भेट द्या

कारण १

काय आहे सलौलीम धरण? (Salaulim Dam) तर मित्रांनो, हा अभियांत्रिकीचा उत्कृष्ट चमत्कार आहे. हे धरण जुरी नदीची उपनदी सलौलीमवर बांधण्यात आले आहे. हे सुंदर ठिकाण शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. २४ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेले हे धरण ४२.७ मीटर उंच आहे. हे दृश्यच मनमोहक आहे. त्यामुळे इथे आल्यावर तुम्ही इथली आठवण मनात साठवून जाता.

(हेही वाचा – 98th Marathi Sahitya Sammelan : दिल्लीत भरणार सारस्वतांचा मेळा)

कारण २

विशेष म्हणजे येथे अनेक मैदानी खेळांचा आनंद लुटता येतो. तसेच अनेक वॉटर गेम्सचा आनंद घेता येतो. पाणी एका अनोख्या अर्धवर्तुळाकार डक-बिल्ड स्पिलवेमधून वाहते, जे धुक्यात वर येते आणि परत नदीत जाते. त्यामुळे सलौलीम (Salaulim Dam) धरणावर घालवलेला वेळ तुमच्यासाठी संस्मरणीय असेल. तुम्ही इथे फोटोग्राफीचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.

कारण ३

सर्वात मोठी आणि विशेष बाब म्हणजे या धरणातून गोव्याच्या मोठ्या भागाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. या धरणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दुसऱ्या बाजूला बोटॅनिकल गार्डन आहे. हे पिकनिकसाठी योग्य ठिकाण आहे. या बागेची रचना म्हैसूरच्या वृंदावन गार्डनप्रमाणे करण्यात आली आहे.

कारण ४

सलौलीम धरणाच्या बॅकवॉटर स्पॉट्सवर तुम्ही पक्षी निरीक्षणाचा आनंद घेऊ शकता. पक्ष्यांच्या अनेक प्रजाती येथे घरटी बांधून राहतात. येथे पर्यटक तासनतास स्पॉटेड किंगफिशर्सकडे पाहत राहतात. या पक्षांकडे पाहत तुमचा दिवस कधी निघून जातो हे तुम्हालाच कळत नाही.

(हेही वाचा – Badlapur explosion: बदलापूरात रासायनिक कंपनीत भीषण स्फोट; कंपनी बेचिराख)

कारण ५

तसेच इथे नेत्रावली वन्यजीव अभयारण्य देखील आहे. इथे सावेरी धबधबा आहे आणि रॅकेट टेल ड्रोंगो सारख्या काही विदेशी पक्ष्यांच्या प्रजाती हे उद्यानाचे मुख्य आकर्षण आहे.

वेळ आणि तिकीट दर :

सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत. प्रवेश शुल्क रु. २०/-
सूचना : तुमच्यासोबत ओळखपत्र ठेवा. इथल्या कॅंटिंगमध्ये ज्यूस आणि आईसक्रीमच मिळते. त्यामुळे जाताना जेवणाचा डबा घेऊन जा.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.