समय रैनाचा (samay raina) जन्म जम्मू येथे एका काश्मिरी पंडित कुटुंबात झाला. त्याने महाराष्ट्रात पुणे इथल्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये प्रिंट अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला होता. पण त्यानंतर तो ओपन माइक कार्यक्रम करू लागला. शेवटी तो विनोदी इन्फ्लुएंसर म्हणून प्रसिद्ध झाला.
याव्यतिरिक्त समय (samay raina) हा Chess.com वर samayraina या नावाने बुद्धिबळ खेळतो. ६ डिसेंबर २०२४ सालापर्यंत समय रैनाचे chess.com वर रॅपिड चेसमध्ये १६२१ एवढे रेटिंग आहे. त्याआधी ३ ऑगस्ट २०२३ साली सर्वाधिक रेटिंग १९४२ एवढे होते. ५ मे २०२१ साली समय रैनाने $१०,००० ची बोटेझ बुलेट इन्व्हिटेशनल ही एक तासाची हौशी बुलेट अरेना स्पर्धा जिंकली होती. ही स्पर्धा Chess.com द्वारे प्रायोजित आणि बोटेझने आयोजित केली होती. तो काही टॉप आंतरराष्ट्रीय ट्विच स्ट्रीमर्समध्ये स्पर्धा करणारा एकमेव भारतीय स्ट्रीमर होता. त्यावेळी त्याने $४००० कमावले होते.
(हेही वाचा – मुंबई, नवी मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात मशिदीच्या नावाखाली Land Jihad चा डाव)
कॉमेडियन समय रैनाचे (samay raina) नाव सध्या चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे, इंडियाज गॉट लेटेंट या कॉमेडी शोच्या एका एपिसोडमध्ये यूट्यूबर रणवीर अलाहबादिया आणि अपूर्व माखिजा यांच्या अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पण्यांवरून सध्या खळबळ माजली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबतच समय रैनाविरोधातही पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान समय रैनाबद्दल (samay raina) सर्वांनाच हे जाणून घ्यायचं आहे. तसंच लोकांना हे देखील जाणून घ्यायचं आहे की, या कॉमेडियनची नेट वर्थ किती आहे… या लेखामध्ये आम्ही तुम्हाला समय रैनाबद्दल थोडी सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर मग पाहुयात…
(हेही वाचा – Sunita Williams अंतराळात किती दिवस होत्या आणि कशी आहे त्यांच्या परतीची चित्तथरारक कथा?)
समय रैना (samay raina) हा एक भारतीय स्टँडअप कॉमेडियन आणि युट्युबर आहे. सध्या तो २७ वर्षांचा आहे. समय रैनाचा जन्म २८ ऑक्टोबर १९९७ रोजी जम्मूमध्ये झाला होता. त्याने पुण्यातल्या पीव्हीजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय इथून प्रिंट अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. कॉमेडीसोबतच समय रैना याने बुद्धिबळ या खेळातही प्रभुत्व मिळवलं आहे. त्याने कोरोना काळामध्ये मोठ्या बुद्धिबळपटूंसोबत खेळून यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे खूप लोकप्रियता मिळवली.
याव्यतिरिक्त २०१९ साली समय रैनाने प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म ऍमेझॉन प्राइम व्हिडिओ वरचा स्टँडअप कॉमेडी शो कॉमिकस्तान सीझन-२ चा सह-विजेता म्हणून स्वतःची खरी ओळख निर्माण केली. तेव्हापासूनच समय रैना (samay raina) हा स्टँडअप कॉमेडी शोच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करत आहे. तरी इंडियाज गॉट लेटेंट या शोच्या माध्यमातून त्याची लोकप्रियता लक्षणीय वाढली. पण सध्या या शोच्या वादामुळे समय रैना चर्चेत आहे.
(हेही वाचा – IPL 2025 : आयपीएलच्या पहिल्या सामन्यात रोहित शून्यावर बाद; नावावर नकोसा विक्रम)
कॉमेडियन समय रैनाची (samay raina) एकूण संपत्ती जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण समय रैनाने त्याच्या कॉमेडीच्या जोरावर करोडोंची संपत्ती कमावली आहे. मीडिया रिपोर्ट्स आणि इकॉनॉमिक टाईम्सनुसार समय रैनाची एकूण संपत्ती ₹१९५ कोटी एवढी आहे. समय रैनाचे लाईव्ह शो देशात आणि जगभरातही खूप लोकप्रिय आहेत. यूट्यूब व्हिडिओ आणि वेगवेगळ्या शोच्या माध्यमातून तो दर महिन्याला दीड कोटी रुपये कमावतो. याव्यतिरिक्त ब्रँड डील आणि लाइव्ह शो यांसारख्या इतर कमाईच्या स्रोतांमधून त्याचं उत्पन्न सतत वाढतच आहे.
एखाद्या युट्युबरसाठी सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असणं खूप गरजेचं आहे. समय रैनाची (samay raina) फॅन फॉलोइंगही चांगली आहे. सध्या कॉमेडियन समय रैनाचे त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर ६ दशलक्ष एवढे फॉलोअर्स आहेत. तसंच त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर ७ दशलक्षपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community