Samsung Galaxy A16 : ६ वर्षं मोफत सॉफ्टवेअर अपडेट देणारा सॅमसंगचा नवीन फोन 

Samsung Galaxy A16 : सॅमसंग कंपनी भारतात आपला नवीन गॅलेक्सी ए सीरिजमधील फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे 

28
Samsung Galaxy A16 : ६ वर्षं मोफत सॉफ्टवेअर अपडेट देणारा सॅमसंगचा नवीन फोन 
Samsung Galaxy A16 : ६ वर्षं मोफत सॉफ्टवेअर अपडेट देणारा सॅमसंगचा नवीन फोन 
  • ऋजुता लुकतुके

सॅमसंग गॅलेक्सीचा ए१६ (Samsung Galaxy A16) स्मार्ट फोन भारतात येत असल्याची बातमी आपण कधीपासून एकतोय. कंपनीनेही आपल्या अधिकृत वेबसाईटवर ‘लवकरच भारतात’ या सदराखाली हा फोन झळकवला आहे. आता या फोनविषयी एक नवीन माहिती समोर आली आहे. कंपनी या फोनसाठी तब्बल ६ वर्षं नवीन सॉफ्टवेअर अप़डेट देणार आहे. सध्या सॅमसंग कंपनी आपल्या उच्च श्रेणींच्या फोनसाठी ७ वर्षांचे अपग्रेड देते तर मध्यम श्रेणीतील फोनसाठी ४ वर्षांचे अपग्रेड देते.

(हेही वाचा- World Food Regulatory Summit : असुरक्षित अन्नामुळे ६० कोटी लोकांना आजार, दरवर्षी जगात ४ लाखांवर मृत्यू)

ए१६ आता लवकरच भारतात लाँच होणार आहे. या फोनचा डिस्प्ले ६.७ इंचांचा असेल. सुपर एमोल्ड इन्फिनिटी डिस्प्ले असलेला हा फोन ९० हर्ट्झचा रिफ्रेश रेट आणि ८०० नीट्सची प्रखरता देऊ शकेल. या फोनमधील प्रोसेसर इक्झिनॉस १३३० मीडियाटेक डिमेन्सिटी ६३०० चिपसेटचा असेल. खासकरून भारतातील फोनमध्ये मीडियाटेक डिमेन्सिटीचाच प्रोसेसर असेल. (Samsung Galaxy A16)

 सॅमसंग नेहमीप्रमाणे चार व्हेरियंटमध्ये हा फोन बाजारात आणण्याची शक्यता आहे. ४ जीबी रॅम आणि १२८ जीबीचं स्टोरेज, ६ जीबीची रॅम, १२८ जीबीचं स्टोरेज, ८ जीबी रॅम, १२८ जीबीचं स्टोरेज तसंच १६ जीबी रॅम आणि २५६ जीबीचं स्टोरेज अशा चार प्रकारात फोन उपलब्ध होईल. याशिवाय फोनचं ५जी मॉडेलही असेल. सॅमसंगच्या इतर फोन प्रमाणे ए१६ फोनही पाणी आणि धुळीपासून सुरक्षित असेल.  (Samsung Galaxy A16)

(हेही वाचा- तुम्हाला माहीत आहे का ? मुंबईतील Girgaum Chowpatty कशासाठी प्रसिद्ध आहे जाणून घ्या, एका क्लिक वर  )

कंपनीने अजून या फोनची जाहिरात सुरू केलेली नाही. पण, फिरट हिरवा, निळा, काळा आणि सोनेरी रंगांत हा फोन उपलब्ध असेल. साधारण डिसेंबर महिन्यात हा फोन भारतात लाँच होईल. त्याची किंमत साधारणपणे २०,००० रुपयांपासून सुरू होईल. (Samsung Galaxy A16)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.