- ऋजुता लुकतुके
सॅमसंग गॅलेक्सी श्रेणीतील हा फोन हा स्वस्तात मस्त अशा प्रकारचाच आहे. आधीपासून तो लोकांमध्ये लोकप्रिय आहे. ६.६ इंचांचा एमोल्ड डिस्प्ले तुम्ही जे व्हिडिओ किंवा फोटो पाहता त्याचा नितांत आनंद देऊ शकतो. एफ१५ ची बॅटरी तर ६,००० एमएएच क्षमतेची आहे. त्यामुळे एकदा चार्ज केल्यानंतर हा फोन दोन दिवस चालू शकतो. मीडियाटेक डिमेन्सिटी ६,१०० चा प्रोसेसर तुम्हाला एकाच वेळी अनेक कामं फोनवर करण्याची मुभा देतो. तसंच फोनची रॅमही १२५ जीबींपासून सुरू होते. तर या फोनमध्ये ५० मेगा पिक्सेलचा कॅमेराही आहे. (Samsung Galaxy F15)
त्यातच आता या फोनवर विविध ई-कॉमर्स साईटवर सवलतींचा भडिमार सुरू झाला आहे. त्यामुळे मूळ १६,९९९ रुपयांचा हा फोन तुम्हाला ११,९९९ रुपयांत मिळू शकणार आहे. ॲमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्टवर (Flipkart) या सवलती लागू आहेत. त्यांचा आढावा घेऊया,
(हेही वाचा – राहुल गांधींचा धारावी दौरा म्हणजे स्लम टुरिझम; शिवसेना उपनेते Rahul Shewale यांची टीका)
ॲमेझॉनवर (Amazon) आयसीआयसीआय बँकेचं (ICICI Bank) क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि तुम्ही प्राईम सभासद असाल तर तुम्हाला या फोनवर ५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे. इतरांसाठी कॅशबॅकची रक्कम ३ टक्के इतकी असेल. (Samsung Galaxy F15)
ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डावर तुम्हाला साडेसात टक्क्यांची थेट सवलत मिळणार आहे. ही सवलत ७५० रुपयांपर्यंत जाते. एयु बँकेवरही (AU Bank) तुम्हाला इतकीच सवलत उपलब्ध आहे. ईएमआयवर तुम्ही फोन घेणार असाल तर तुम्हाला महिन्याला ५८३ रुपये मोजावे लागतील. (Samsung Galaxy F15)
फ्लिपकार्टवर (Flipkart) या फोनसाठी आणखी तगडी ऑफर आहे. १२८ जीबी आणि ८ रॅमचा हा फोन फ्लिपकार्टवर तुम्हाला २० टक्के कॅशबॅक दरात मिळेल. त्यामुळे फोनची किंमत ३,००० रुपयांनी कमी होऊन १३,९९९ रुपयांपर्यंत खाली येईल. यात आणखी सवलतीही तुम्हाला मिळू शकतात. फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्डावर तुम्हाला ५ टक्के सवलत मिळेल. जुन्या फोन देऊन नवीन घेणार असाल तर तुम्हाला अतिरिक्त २,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकेल. (Samsung Galaxy F15)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community