-
ऋजुता लुकतुके
सॅमसंग कंपनीच्या फ्लॅगशिप एस सीरिजमधील नवीन फोन एस२४ एफई अखेर जगभरात आणि भारतातही लाँच झाला आहे. सुरुवातीची ऑफर म्हणून ग्राहकांना चक्क १२८ स्टोरेज असलेल्या फोनच्या किंमतीत २५६ जीबीचं स्टोरेज मिळणार आहे. शिवाय या फोनमध्ये असेल गॅलेक्सी एआयच्या सुविधा. आधी लीक झाल्याप्रमाणे हे फोन ५९,९९९ रुपयांपासूनच सुरू होणार आहेत. निळा, ग्रॅफाईट आणि मिंट या रंगांत हे फोन उपलब्ध असतील. (Samsung Galaxy S24 FE)
एस२४ या फ्लॅगशिप मालिकेतील हा किफायतशीर फोन असेल. कारण, ६.७ इंचांचा डिस्प्ले, ४,७०० एमएएच क्षमतेची बॅटरी, ५० मेगा पिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा असं सगळं तुम्हाला मिळणार आहे ते ५९,९०० रुपयांपासून.
पण, युरोपमध्ये या फोनचं डिझाईन आणि लुक आधीच लोकांसमोर एका लीक्ड व्हिडीओमधून आला आहे. या नवीन फोनच्या माध्यमातून सॅमसंग कंपनी आपला पहिला फ्लॅट स्क्रीन असलेला एमोल्ड डिस्प्ले फोन बाजारात आणत आहे. आणि या फोनची प्रखरता जास्तीत जास्त २५०० नीट्स इतकी असू शकते. (Samsung Galaxy S24 FE)
(हेही वाचा – Pune News: गरबा खेळत असताना भोवळ आली, आणि घडलं असं काही…पहा व्हिडीओ)
दिसायला सॅमसंगची नवीन सीरिज ही एस२३ प्रमाणेच असेल. पण, एस२४ अल्ट्रा मॉडेलमध्ये फोनचं वजन कमी करण्यासाठी कंपनी टिटानियम धातू वापरत आहे. तर इतर दोन मॉडेल अजूनही ॲल्युमिनिअम फ्रेम असलेलीच असतील.
Sit back and edit on! The latest #GalaxyS24 FE is here, featuring Smart Photo Assist! This genius smartphone tool thinks ahead, making photo editing easier than ever. Capture, enhance, and shine!
Know more: https://t.co/ibfYFwsNl2 #Samsung pic.twitter.com/L9dsf5eekC
— SamsungNewsroomIN (@SamsungNewsIN) October 4, 2024
(हेही वाचा – BJP ला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडी MIM ला जवळ करणार?)
या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ चा तिसऱ्या पिढीतील चिपसेट असेल. तर प्रोसेसर क्वालकॉम कंपनीचा आहे. तीनही मॉडेलची रॅम ८ जीबी ते जास्तीत जास्त १२ जीबी पर्यंत आहे. आणि फोनमधील स्टोरेजही १ टेराबाईटपर्यंत आहे. पण, १ टेराबाईटचा फोन हा लिमिटेड एडिशन असेल. (Samsung Galaxy S24 FE)
या फोनमधील कॅमेरा ५० मेगा पिक्सेलचा असेल. आणि अल्ट्रावाईड लेन्स १२ मेगापिक्सेलची तर सेल्फी कॅमेरा ८ मेगा पिक्सेलचा असेल. अशा या फोनची किंमत ५९,९०० रुपयांपासून भारतात सुरू होईल. फोन घेण्यासाठी सॅमसंगनेच ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआय देऊ केला आहे. त्यासाठी सॅमसंग फायनान्स कंपनी अर्थसहाय्य करणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community