Samsung Galaxy S24 FE : सॅमसंग कंपनीचा फ्लॅगशिप तरीही किफायतशीर असलेला एस२४ एफई फोन

Samsung Galaxy S24 FE : सॅमसंगकडून चुकून एस२४ एफई फोनची किंमतही उघड झाली आहे 

62
Samsung Galaxy S24 FE : सॅमसंग कंपनीचा फ्लॅगशिप तरीही किफायतशीर असलेला एस२४ एफई फोन
Samsung Galaxy S24 FE : सॅमसंग कंपनीचा फ्लॅगशिप तरीही किफायतशीर असलेला एस२४ एफई फोन
  • ऋजुता लुकतुके 

सॅमसंग कंपनीच्या फ्लॅगशिप एस सीरिजमधील नवीन फोन एस२४ एफई आता कधीही जागतिक स्तरावर लाँच होऊ शकतो. पण, त्यापूर्वीच हा फोन कसा असेल याचा प्रोमो सगळ्यात आधी लीक झाला. आता तर कंपनीकडूनच एफई फोनची किंमत चुकून उघड झाली आहे. अमेरिकेतील एका जाहिरातीत २५६ जीबी आणि ५१२ जीबी फोनच्या मॉडेलसमोर त्याची किंमतही लिहिलेली होती. त्यामुळे लाँच होण्यापूर्वीच एस२४ एफई विषयी बरीच माहिती आता उघड झाली आहे. (Samsung Galaxy S24 FE)

एस२४ या फ्लॅगशिप मालिकेतील हा किफायतशीर फोन असेल, असं त्यावरून नक्की म्हणता येईल. कारण, ६.७ इंचांचा डिस्प्ले, ४,७०० एमएएच क्षमतेची बॅटरी, ५० मेगा पिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा असं सगळं तुम्हाला मिळणार आहे ते ५४,००० रुपयांपासून. (Samsung Galaxy S24 FE)

पण, युरोपमध्ये या फोनचं डिझाईन आणि लुक आधीच लोकांसमोर एका लीक्ड व्हीडिओमधून आला आहे. या नवीन फोनच्या माध्यमातून सॅमसंग कंपनी आपला पहिला फ्लॅट स्क्रीन असलेला एमोल्ड डिस्प्ले फोन बाजारात आणत आहे. या फोनची प्रखरता जास्तीत जास्त २५०० नीट्स इतकी असू शकते. (Samsung Galaxy S24 FE)

(हेही वाचा- Rahul Gandhi भारतीय आहेत कि विदेशी? उच्च न्यायालयाची केंद्र सरकारकडे विचारणा)

दिसायला सॅमसंगची नवीन सीरिज ही एस२३ प्रमाणेच असेल. पण, एस२४ अल्ट्रा मॉडेलमध्ये फोनचं वजन कमी करण्यासाठी कंपनी टिटानियम धातू वापरत आहे. तर इतर दोन मॉडेल अजूनही ॲल्युमिनिअम फ्रेम असलेलीच असतील. (Samsung Galaxy S24 FE)

या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ चा तिसऱ्या पिढीतील चिपसेट असेल. तर प्रोसेसर क्वालकॉम कंपनीचा आहे. तीनही मॉडेलची रॅम ८ जीबी ते जास्तीत जास्त १२ जीबी पर्यंत आहे. फोनमधील स्टोरेजही १ टेराबाईटपर्यंत आहे. पण, १ टेराबाईटचा फोन हा लिमिटेड एडिशन असेल. (Samsung Galaxy S24 FE)

(हेही वाचा- Navi Mumbai च्या 3500 हून अधिक स्वच्छताकर्मींची आरोग्य तपासणी)

या फोनमधील कॅमेरा ५० मेगा पिक्सेलचा असेल. अल्ट्रावाईड लेन्स १२ मेगापिक्सेलची तर सेल्फी कॅमेरा ८ मेगा पिक्सेलचा असेल. अशा या फोनची किंमत ५४,००० रुपयांपासून भारतात सुरू होईल. (Samsung Galaxy S24 FE)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.