
-
ऋजुता लुकतुके
सॅमसंग कंपनीचा फ्लॅगशिप एस सीरिजमधील नवीन फोन आता लवकरच जगभरात लाँच होणार आहे. जगभरात या फोनविषयी उत्सुकता आहे. जागतिक स्तरावर होणाऱ्या गॅलेक्सी अनपॅक्ड या कार्यक्रमात सॅमसंग गॅलेक्सी व्हॅनिला एस२४, सॅमसंग गॅलेक्सी एस२४ प्लस आणि सॅमसंग गॅलेक्सी एस२४ अल्ट्रा असे सीरिजमधील ३ फोन जगात एकाच वेळी लाँच झाले. तेव्हाच एस२५ एज फोनची झलकही कंपनीने दाखवली होती. त्यानंतर मोबाईल कॉन्फरन्समध्ये हा फोन लोकांना दिसला होता. पण, तेव्हा तो लोकांच्या हातात आला नव्हता. (Samsung Galaxy S25 Edge)
पण, आता युरोपमध्ये या फोनचं डिझाईन आणि लुक आधीच लोकांसमोर एका लीक्ड व्हीडिओमधून आलं आहे. या नवीन फोनच्या माध्यमातून सॅमसंग कंपनी आपला पहिला फ्लॅट स्क्रीन असलेला एमोल्ड डिस्प्ले फोन बाजारात आणत आहे. या फोनची प्रखरता जास्तीत जास्त २५०० नीट्स इतकी असू शकते. दिसायला सॅमसंगची नवीन सीरिज ही एस२३ प्रमाणेच असेल. पण, एस२५ एजमध्ये फोनचं वजन कमी करण्यासाठी कंपनी टिटानियम धातू वापरत आहे. तर इतर दोन मॉडेल अजूनही ॲल्युमिनिअम फ्रेम असलेलीच असतील. (Samsung Galaxy S25 Edge)
(हेही वाचा – MSRTC : …अन्यथा एसटी बसगाड्यांना हॉटेलवर थांबण्यास केली जाईल मनाई; परिवहन मंत्र्यांचा आदेश)
Samsung Galaxy S25 Edge⚡
🔥 6.6″ 2K 120Hz Display
📷 200MP + 12MP Rear | 10MP Front
💪 Snapdragon 8 Elite, 12GB RAM
🔋 3900mAh, 25W Charging
📱 One UI 7 (Android 15) | 7 Years Updates
🛠️ Titanium Frame | 5.84mm Thin!Expected launch: April 2025. Thoughts? pic.twitter.com/4rZIVCS78k
— Sam Lover – Welcome to Samsung World (@SamLoverBlog) March 26, 2025
या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ चा तिसऱ्या पिढीतील चिपसेट असेल. तर प्रोसेसर क्वालकॉम कंपनीचा आहे. तीनही मॉडेलची रॅम ८ जीबी ते जास्तीत जास्त १२ जीबी पर्यंत आहे. फोनमधील स्टोरेजही १ टेराबाईटपर्यंत आहे. पण, १ टेराबाईटचा फोन हा लिमिटेड एडिशन असेल. ६.६ इंचांचा डिस्प्ले, ३,९०० एमएएच क्षमतेची बॅटरी आणि अँड्रॉईड ७ प्रणाली ही फोनची वैशिष्ट्य असतील. (Samsung Galaxy S25 Edge)
एस २३ फोन प्रमाणेच एस२४ मध्येही २०० मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा असेल. पण, त्याच्या झूम, टेलिफोटो आणि पेरिस्कोप लेन्समध्ये बरीच सुधारणा करण्यात आली आहे. सगळ्यात महागड्या अल्ट्रा फोनची किंमत १,३४,००० रुपयांच्या घरात आहे. तर फोनची सुरुवात ९४,००० रुपयांपासून होईल. (Samsung Galaxy S25 Edge)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community