Samsung TV Plus ने आपल्‍या चॅनेल ऑफरिंग्‍जमध्‍ये केला विस्‍तार; ग्राहकांसाठी ‘या’ दोन चॅनेलचा केला शुभारंभ

81
Samsung TV Plus ने आपल्‍या चॅनेल ऑफरिंग्‍जमध्‍ये केला विस्‍तार; ग्राहकांसाठी 'या' दोन चॅनेलचा केला शुभारंभ
Samsung TV Plus ने आपल्‍या चॅनेल ऑफरिंग्‍जमध्‍ये केला विस्‍तार; ग्राहकांसाठी 'या' दोन चॅनेलचा केला शुभारंभ

गुरूग्राम, ऑगस्‍ट, २०२४: सॅमसंग टीव्‍ही प्‍लस (Samsung TV Plus) या भारतातील ब्रँडच्‍या फ्री अॅड-सपोर्टेड स्‍ट्रीमिंग टीव्‍ही (फास्‍ट) सर्विसने आपल्‍या पोर्टफोलिओमध्‍ये आज तक एचडी आणि द लल्‍लनटॉपच्‍या लाँचची घोषणा केली आहे. सॅमसंग टीव्‍ही प्‍लस (Samsung TV Plus) आणि टीव्‍ही टूडे नेटवर्क यांच्‍यामधील सहयोगामधून उच्‍च दर्जाचे प्रोग्रामिंग वितरित करण्‍याप्रती आणि झपाट्याने वाढत असलेल्‍या कनेक्‍टेड विश्‍वामध्‍ये प्रेक्षकांच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍याप्रती सॅमसंगची कटिबद्धता दिसून येते.

टीव्‍ही टूडे नेटवर्कच्‍या फास्‍ट चॅनेल ऑफरिंग द लल्‍लनटॉप आणि आज तक एचडी (Aaj Tak HD) घरातील सर्वात मोठ्या स्क्रिनवर लक्षवेधक व प्रीमियम मोफत कन्‍टेन्‍टप्रती ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करतील. भारतातील कनेक्‍टेड टीव्‍ही बेस विकसित होत आहे, जेथे अधिकाधिक कुटुंबं इंटरनेट-सक्षम स्‍मार्ट टीव्‍ही पर्यायांचा अवलंब करत आहेत.

(हेही वाचा – तुमच्या मनातील सावरकर द्वेष पुढे आला; भाजपाचा Uddhav Thackeray यांच्यावर पलटवार)

”आमचा सॅमसंग टीव्ही प्‍लस (Samsung TV Plus) प्लॅटफॉर्मवर आमचे प्रेक्षक व जाहिरातदारांसाठी अद्वितीय उपलब्‍धता व अपवादात्‍मक मूल्‍य देण्‍याचा प्रयत्‍न आहे. भर करण्‍यात आलेले आज तक एचडी (Aaj Tak HD) आणि द लल्‍लनटॉप (The Lallantop) चॅनेल्‍स व्‍यवसाय, राजकारण, मनोरंजन अशा विश्‍वातील अद्ययावत बातम्‍या अधिक प्रमाणात उपलब्‍ध करून देतील. टीव्‍ही टूडे नेटवर्कसोबतच्‍या या सहयोगामधून ती कटिबद्धता दिसून येते,” असे सॅमसंग टीव्‍ही प्‍लस (Samsung TV Plus) इंडियाच्‍या पार्टनरशीप्‍सचे प्रमुख कुणाल मेहता म्‍हणाले.

”आम्‍हाला सॅमसंग टीव्‍ही प्‍लस (Samsung TV Plus) इंडियावर आमच्‍या दोन नवीन फास्‍ट चॅनेल्‍सच्‍या लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे. हा सहयोग आमच्‍यासाठी महत्त्वपूर्ण टप्‍पा आहे, ज्‍यामुळे आम्‍हाला लोकप्रिय व नाविन्‍यपूर्ण स्‍मार्ट टीव्‍ही प्‍लॅटफॉर्म्‍सच्‍या माध्‍यमातून अधिकाधिक प्रेक्षकांना आमचे वैविध्‍यपूर्ण व सर्वसमावेशक कनेक्‍ट सादर करण्‍याची संधी मिळते. कनेक्‍टेड टीव्‍ही प्रेक्षकांसाठी अनेक पर्याय उपलब्‍ध असण्‍यासह हा सहयोग आम्‍हाला प्रेक्षकवर्गामध्‍ये वाढ करण्‍यास आणि नवीन तंत्रज्ञानांचा अवलंब करणाऱ्यांशी संलग्‍न होण्‍यासाठी सक्षम करतो, ज्‍यामधून आमचे कन्‍टेन्‍ट विविध व्‍युइंग इकोसिस्‍टम्‍समध्‍ये उपलब्‍ध राहण्‍याची खात्री मिळते,” असे टीव्‍ही टीएनच्‍या डिजिटल बिझनेसचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी सलिल कुमार म्‍हणाले.

सॅमसंग टीव्‍ही प्‍लस भारतभरातील लाखो वापरकर्त्‍यांना १०० हून अधिक फास्‍ट लाइव्‍ह चॅनेल्‍स आणि हजारो ऑन-डिमांड चित्रपट व टीव्‍ही मालिकांचा आनंद देते, जे सर्व १०० टक्‍के मोफत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.