सनातन संस्था, हिंदु जनजागृती समितीच्या ऑनलाईन ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चे आयोजन!

मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलुगु, तमिळ, पंजाबी, बंगाली, ओडिया आणि मल्याळम् या 11 भाषांमध्ये 23 आणि 24 जुलैला ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

132

लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढणे आणि ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करणे ही काळानुसार श्रीगुरुसेवाचा आहे. या उद्देशाने 23 जुलै 2021 रोजी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा केला जाणार आहे. कोरोना महामारीमुळे यंदा ऑनलाईन कार्यक्रम होणार आहेत.

११ भाषांमध्ये होणार गुरुपौर्णिमा!

मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलुगु, तमिळ, पंजाबी, बंगाली, ओडिया आणि मल्याळम् या 11 भाषांमध्ये 23 आणि 24 जुलैला ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या महोत्सवांत श्रीगुरुपूजन, सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा संग्रहित भाग, स्वसंरक्षण प्रात्यक्षिके (बचाव आणि आक्रमण), आपत्काळाच्या दृष्टीने करावयाची सिद्धता (चलचित्र), तसेच आत्पकाळात हिंदूंचे रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना याविषयी वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे.

(हेही वाचा : मशिदींवरील भोंग्यांविरूद्ध सिनेमागृहात घुमणार ‘आवाज ‘!)

इथे सहभागी व्हा गुरुपौर्णिमा महोत्सवात!

गुरु म्हणजे काय, गुरुंचे जीवनातील महत्त्व, गुरुकृपा कार्य कशी करते, त्यासाठीचे मार्गदर्शन या महोत्सवात होणार आहे. तसेच हिंदूंचे धार्मिक संघटनही होईल. तरी सर्व राष्ट्र आणि धर्मप्रेमी हिंदूंनी सहकुटुंब ऑनलाईन ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चा लाभ करून घ्यावा, तसेच आपले मित्र-परिवार, परिचित, नातेवाईक यांनाही याचे निमंत्रण द्यावे, असे आग्रहाचे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

मराठी भाषेतील ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव’ हा 23 जुलैला सायंकाळी 7 वाजता होणार असून तो ‘यू-ट्यूब’वर पहाता येईल. त्याच्या लिंक्स पुढीलप्रमाणे :

Youtube.com/SanatanSanstha

www.sanatan.org/mr/

सनातन संस्थेच्या संकेतस्थळावरील पुढील ‘लिंक’वर अन्य भाषांमधील गुरुपौर्णिमा महोत्सवांविषयी अधिक माहिती देण्यात आली आहे

https://www.sanatan.org/mr/gurupurnima  

(हेही वाचा : मुंबईकरांना खुशखबर! तानसा, मोडकसागर भरला!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.