-
ऋजुता लुकतुके
टेनिस खेळात भारताचं नाव रोशन करणारी सगळ्यात यशस्वी महिला टेनिसपटू म्हणजे सानिया मिर्झा. एकेरीच्या क्रमवारीतील भारताची सगळ्यात वरची खेळाडू आणि ६ दुहेरी ग्रँडस्लॅम नावावर असलेली सानिया मिर्झा आता निवृत्त झाली आहे. दुहेरीत ती एकेकाळी अव्वल क्रमांकापर्यंत पोहोचली होती. केंद्रसरकारने अर्जुन पुरस्कार, पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार देऊन तिचा गौरव केला आहे. (Sania Mirza Net Worth)
(हेही वाचा- महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ ? Sharad Pawar गटातील खासदार Ajit Pawar गटात जाण्याच्या चर्चेला माध्यमांमध्ये उधाण)
टेनिसमधील या यशामुळे व्यावसायिक टेनिसमधून तर तिने आर्थिक कमाई केलीच. शिवाय भारतातील ती एक लोकप्रिय सेलिब्रिटी होती. त्यामुळे काही महत्त्वाच्या जाहिरातींमध्येही ती झळकली. आणि या सगळ्यातून तिने २६ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी कमाई केली. म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये तिची कमाई आहे २१६ कोटी रुपयांची. तिचं वार्षिक उत्पन्न आजही २५ कोटी रुपयांच्या घरात आहे. (Sania Mirza Net Worth)
जाहिराती, गुंतवणूक आणि यशस्वी उद्योग यातून तिची कमाई होते. सानिया एशियन पेंट्स, डेन्युब प्रॉपर्टीज, लॅक्मे आणि हर्शीज अशा काही उत्पादनांची ब्रँड अँबेसिडर आहे. तसंच भारत आणि दुबईत तिने सानिया मिर्झा टेनिस अकादमीही सुरू केली आहे. सानिया पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकबरोबर झालेल्या लग्नानंतर दुबईत स्थायिक झाली होती. आता दोघांचा घटस्फोट झाला असला तरी ती बराच वेळ तिथे घालवते. तिथे ती आपली टेनिस अकादमीही चालवते. त्याचबरोबर हैद्राबादमध्येही तिचं घर आहे. हैद्राबादमधील तिचं घर हे १३ कोटी रुपयांचा बंगला आहे. आणि आधुनिक स्थापत्यशास्त्राचं उदाहरण म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तर दुबईतील तिचं घरही आलिशान आणि अरबी पद्धतीचं आहे. (Sania Mirza Net Worth)
(हेही वाचा- गाईला राष्ट्रमातेच्या दर्जासाठी Mahakumbh मध्ये दररोज ९ तास होणार महायज्ञ)
सानियाच्या दाराशी बीएमडब्ल्यू ७, रेंज रोव्हर, जॅग्वार, पोर्श आणि आऊडी अशा गाड्यांचा ताफा आहे. (Sania Mirza Net Worth)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community