३ लाखात वाघ, १ लाखात बिबट्या घ्या! कसे ते वाचा…

वनसंरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जी. मल्लिकार्जुन यांनी वन्य प्राण्यांसाठी दत्तक योजना सुरु केली आहे.

79

सध्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन्य प्राणी आहेत, त्यामध्ये अनेक बंदिस्त प्राणीही आहेत. त्यांच्या पालनपोषणाचा खर्च वाढत आहे. या प्राण्यांच्या देखभालीसाठी लागणारा खर्च वाढत आहे, त्याची तरतूद करण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने मोठी शक्कल लढवली आहे. त्यामध्ये थेट या वन्य प्राण्यांची जबाबदारी स्वीकारण्यासाठी दत्तक योजना सुरु केली आहे.

१ वर्षासाठी दत्तक योजना!

वनसंरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जी. मल्लिकार्जुन यांनी ही दत्तक योजना सुरु केली आहे. या दत्तक योजनेनुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली येथील वन्य प्राणी आता दत्तक घेता येतील. सिंह, वाघ, बिबट, वाघाटी अशा अनेक बंदिस्त वन्य प्राण्यांची देखभाल इथे केली जाते. उद्यानातील बंदिस्त वन्य प्राण्यांना दत्तक घेतल्यामुळे वने व वन्यजीव संवर्धनाच्या अनमोल कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. वन्यजीव प्रेमी, संस्था आणि कंपनी यांनी प्राण्यांना १ वर्षाकरीता दत्तक घेऊन वन्यजीव व्यवस्थापनात सहभागी व्हावे, असे आवाहन वनसंरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जी. मल्लिकार्जुन यांनी केले आहे. ही दत्तक रक्कम एका वर्षांसाठी आहे. संपूर्ण माहिती आणि आवेदन करण्याकरीता इच्छुकांनी खालील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वन संरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व) मुंबई २. अधिक्षक, सिंह विहार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व) मुंबई. ईमेल – lionsafaripark@gmail.com, भ्रमणध्वनी क्र. ७०२०२८२७१४

(हेही वाचा : लसीकरणाची बदललेली वेळ कोणती? जाणून घ्या!)

प्राणी आणि किंमत पुढीलप्रमाणे!

  • वाघ – ३ लाख १० हजार
  • सिंह – ३ लाख
  • बिबट – १ लाख २० हजार
  • वाघाटी  – ५० हजार नीलगाय – ३० हजार
  • चितळ – २० हजार
  • भेकर – १० हजार
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.