देवी सरस्वतीची वेद आणि विद्या, संगीत, हस्तकला, बुद्धी, कला आणि शुभशकुन माता म्हणून पूजा केली जाते. देवी सरस्वती ब्रह्मदेवाची सहचारिणी आहे. सरस्वती देवीला वाग्देवी असंही म्हटलं जातं. वाग्देवी म्हणजे वाचेची (स्वरयंत्रणा) अधिष्ठात्री देवी होय.
सरस्वती मातेचा सर्वात जुना उल्लेख ऋग्वेदात सापडतो. वैदिक काळापासून ते आधुनिक काळापर्यंत, संगीतकारांपासून शास्त्रज्ञांपर्यंत सर्वजण सरस्वती देवीने आपल्या कामात मार्गदर्शन करावं यासाठी प्रार्थना करतात. मराठी दिनदर्शिकेप्रमाणे दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात पंचमीला ‘वसंत पंचमी’ या दिवशी साजरी केली जाते. वसंतपंचमीच्या दिवशी सरस्वती देवीची जयंती साजरी करण्यात येते. (saraswati mantra)
(हेही वाचा – Budget 2025 : राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाची घोषणा, १० मार्चला अर्थसंकल्प सादर होणार)
या दिवशी मंदिरे, घरे आणि अगदी शाळा आणि महाविद्यालयांमध्येही वसंत पंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. श्वेत म्हणजे पांढरा रंग हा देवी सरस्वतीला विशेष प्रिय आहे. या पांढऱ्या रंगाचं या दिवशी विषेश महत्त्व असतं. या दिवशी शारदा देवीच्या मूर्तीला पांढरे वस्त्र परिधान केले जातात. भक्त मनोभावे देवीची पूजा करतात. देवीला मिठाईचा नैवेद्य दाखवला जातो. मग हा नैवेद्य पूजेला उपस्थित असलेल्या सर्व लोकांना ‘प्रसाद’ म्हणून वाटण्यात येतो. ‘वसंत पंचमी’पासूनच वसंत ऋतूची सुरुवात होते.
सरस्वती मंत्रांमुळे देवीच्या भक्तांची भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारे प्रगती होते. सरस्वती देवी ही वाणी, कला, संगीत आणि मनशक्तीची देवी आहे. देवी सरस्वतीमुळेच मानवाला वाचा मिळाली. श्वेत वस्त्र परिधान केलेली, चतुर्भुजा हंसारूढ असलेली देवी हे पवित्रता, सौंदर्य, ज्ञान आणि सत्य यांचे प्रतीक आहे. देवीची वीणा ही सृजनशीलता आणि कला यांचं प्रतीक, देवीच्या हातात असलेलं पुस्तक हे वेदांचं प्रतीक आहे. (saraswati mantra)
ध्यानाची शक्ती दर्शविणारी स्फटिक माला देवीने धारण केलेली आहे. कायाकल्प आणि शुद्धीकरण शक्ती दर्शविणारं पाण्याचं पवित्र सरोवर आहे. अशाप्रकारे देवीचं रूप मनमोहक आणि पवित्र आहे.
(हेही वाचा – राज्यातील ITI महाविद्यालयांना मिळणार महापुरुषांची नावे)
देवी सरस्वतीचे काही मंत्र
- ओम ऐं वाग्देवयै विद्महे कामराजया धीमही, तन्नो देवी प्रचोदयात..!!
- ओम ऐम ऐम ऐम ह्रीम ह्रीम ह्रीम सरस्वत्यै नमः..!!
- ओम श्रीं ह्रीं सरस्वत्याय नमः..
- ओम वागीश्वरी श्रीम क्लीम..!!
- ओम ॐ ह्रीं श्रीं वाग्देवायै सरस्वत्याय नमः !!
- ओम शारद्याय नमः !!
हेही पहा –
Join Our WhatsApp Community