मुंबईचे कासव जाणार पाकिस्तानला!

164

कासव प्रजातीचे होणारे स्थलांतर,त्यावर होणारा परिणाम या सगळ्याची माहिती मिळावी, म्हणून संशोधन अभ्यास सुरू केला गेला. त्यासाठी अचूक माहिती मिळण्यासाठी संशोधन करता यावे म्हणून कासवांच्या पाठीवर ‘सॅटलाईट ट्रान्समीटर’ लावून त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. आता रत्नागिरी येथून सोडलेल्या कासवांपैकी प्रथमा कासवाने वेळापासून तब्बल 250 किलोमीटरचे अंतर पार केले आहे. हे कासव सध्या मुंबईला मुक्कामी आहे. येथून हे कासव पुढे गुजरात आणि पाकिस्तान वा ओमानच्या दिशेने जाईल, असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे.

अभ्यासासाठी करण्यात आला प्रयोग 

दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्यादरम्यान ‘ऑलिव्ह रिडले’ प्रजातीची मादी कासवे कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येतात. अरबी समुद्रातील त्यांचा अधिवास आणि स्थलांतर जाणून घेण्यासाठी त्यांना ‘सॅटलाईट ट्रान्समीटर’ लावण्याचा निर्णय ‘मँग्रोव्ह फाऊंडेशन’ने घेतला. याच संशोधन उपक्रमात पहिल्या टप्प्यात पाच मादी कासवाच्या पाठीवर ‘सॅटलाईट ट्रान्समीटर’ लावण्यात आले.

पुन्हा पाण्यात सोडले

मंडणगड तालुक्यातील वेळासच्या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या ‘ऑलिव्ह रिडले’ मादी कासवाला डब्लूआयआयचे शास्त्रज्ञ डॉ. आर. सुरेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सॅटलाईट ट्रान्समीटर’ बसवण्यात आले.  पश्चिम किनारपट्टीवर प्रथमच सागरी कासवाला ‘सॅटलाईट ट्रान्समीटर’ लावण्यात आले असून, या मादी कासवाचे नाव ‘प्रथमा’ ठेवण्यात आले होते.

( हेही वाचा: यंदा उन्हाळी सुट्ट्या लांबणीवर, रविवारीही भरणार शाळा ? )

सॅटेलाईट कासवांपैकी कोणत्या कासवाने किती केला प्रवास ?

  • प्रथमा- वेळासपासून 250 डहाणूपासून 86
  • सावणी- आंजर्लेपासून 101 मुरुडपासून 73
  • वनश्री- गुहागरपासून 74 गणेशगुळपासून 5
  • रेवा- गुहागरपासून 156 तोंडवलीपासून 5
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.