एसबीआय कार्डच्या वतीने फेस्टीव्ह ऑफर 2022 ची घोषणा

87

एसबीआय कार्ड, भारताचा सर्वात मोठा प्यूअर-प्ले कार्ड जारीकर्ता असून भारतामधील ग्राहकांसाठी सप्टेंबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2022 या उत्सवी मोसमात अनेक आकर्षक फेस्टिव्ह ऑफर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. टियर 1, टियर 2, टियर 3 शहरांमध्ये 1600 पेक्षा अधिक ऑनलाईन आणि ऑफलाईन व्यापाऱ्यांचा समावेश असून एसबीआय कार्डचा उद्देश आपल्या ग्राहकांसाठी खरेदी अनुभव अधिक लाभदायी करून उत्सवी धामधुमीत भर घालण्याचा आहे. इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, फॅशन आणि लाईफस्टाईल, ज्वेलरी, ट्रॅव्हल तसेच ऑनलाईन बाजारपेठा इत्यादींत लोकप्रिय वर्गवारीत विस्तृत स्वरूपाचे आनंददायक प्रस्ताव उपलब्ध असतील.

( हेही वाचा : महापालिकेत आता पूर्ण क्षमतेने आधार व्हेरिफाईड फेशियल हजेरी; आणखी २५ ठिकाणी बसवणार प्रणाली)

फेस्टिव्ह ऑफर 2022 करिता एसबीआय कार्ड ग्राहकांनी 2600 शहरांमध्ये 70 हून अधिक राष्ट्रीय तर 1550 प्रादेशिक व स्थानिक (हायपरलोकल) प्रस्तावांचा समावेश केलेला आहे. या फेस्टिव्ह ऑफरचा भाग म्हणून ग्राहकांना विविध भागीदार ब्रँड्सकडून 22.5% कॅशबॅकचा लाभ मिळणार आहे. ‘अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल’करिता अमेझॉनसोबत एसबीआय कार्डस्ची विशेष भागीदारी ही एसबीआय कार्ड ग्राहकांकरिता महत्त्वाच्या ऑफरपैकी एक ऑफर आहे. हा यावर्षीचा एक मोठा ऑनलाईन सेल इव्हेंट असेल, जो 03 ऑक्टोबर 2022 पर्यंत लाईव्ह असणार आहे. त्याशिवाय एसबीआय कार्ड आपल्या मौल्यवान ग्राहकांकरिता जवळपास 28 मुख्य जागतिक तसेच राष्ट्रीय ब्रँड्सकडून वैविध्यपूर्ण ऑफर घेऊन आले आहेत. यामध्ये फ्लिपकार्ट, सॅमसंग मोबाईल, रिलायन्स ट्रेंडस्, पॅंटलून्स, रेमंड्स, एलजी, सॅमसंग, सोनी, एचपी, मेक माय ट्रीप, गोआयबीबो, विशाल मेगा मार्ट, रिलायन्स ज्वेल्स, कॅरेटलेन, हिरो मोटर्स आणि तत्सम नामांकित ब्रँड्सचा समावेश आहे.

एसबीआय कार्ड’चे एमडी आणि सीईओ रामा मोहन राव अमारा यांच्यानुसार, “आमच्या अनुभवाप्रमाणे, उत्सवी मोसम हा नेहमीच जास्त प्रमाणात खर्चिक असतो, मग ग्राहकांनी तशी तजवीज केलेली असो किंवा नसो! ग्राहककेंद्री ब्रॅंड म्हणून, जेव्हा आमचे ग्राहक खरेदी करतील तेव्हा त्यांचा पेमेंट अनुभव वृद्धिंगत कसा होईल याकडे आमचा कल असतो. मग खरेदी ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन. या पार्श्वभूमीवर, प्रस्तावांवर लक्ष केंद्रित करताना, उत्पादने ही अधिकाधिक मूल्य-चालना लाभलेली आणि खर्चाच्या गरजांनुरूप ग्राहकांच्या दृष्टीने समर्पक राहतील हे आम्ही पाहतो. आमच्या फेस्टिव्ह ऑफर म्हणजे या प्रयत्नांचे पडसाद आहेत तसेच आम्हाला आशा आहे की, या माध्यमातून आमच्या ग्राहकांसाठी सणासुदीचा आनंद द्विगुणित करणे आम्हाला शक्य होईल.”

उत्सवी खरेदीचा उत्साह आणखी वाढविणे तसेच ग्राहकांकरिता खरेदी सुलभ करण्याकरिता, एसबीआय कार्ड ईएमआय आता भारतामधील 1.6 लाख+ व्यापारी आणि 2.25 लाख+ दुकानांत उपलब्ध आहे. ग्राहकांसाठी 25+ इलेक्ट्रॉनिक आणि मोबाईल ब्रॅंडसवर ईएमआय अॅट नो एक्स्ट्रा कॉस्टचा लाभ मिळतो. तसेच निवडक प्रादेशिक व्यापाऱ्यांकडे ग्राहकांना ईएमआय व्यवहारावर 15% कॅशबॅकचा आनंद घेता येईल.

एसबीआय कार्डच्या फेस्टिव्ह ऑफर्सविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी, SBI Card websiteला भेट देता येईल.

एसबीआय कार्डविषयी

एसबीआय कार्डस् अँड पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड (एसबीआय कार्ड) ही एक बँकिंगएतर वित्त कंपनी आहे. ती वैयक्तिक कार्डधारकांना आणि कॉर्पोरेट ग्राहकांना व्यापक क्रेडीट कार्ड पोर्टफोलियो देऊ करते. यात जीवनशैली, बक्षिसे, प्रवास आणि इंधनाचा आणि बँकिंग भागीदारी कार्ड्स तसेच उत्पन्न प्रोफाईल आणि जीवनशैलीच्या दृष्टीने सर्व महत्त्वाच्या कार्डधारक विभागांसह कॉर्पोरेट कार्डसचा समावेश आहे. आर्थिक वर्ष 23 च्या पहिली तिमाही दरम्यान, ब्रँडकडे 14 दशलक्षपेक्षा अधिक वापरातील कार्ड्सचा व्यापक आधार आहे. संभाव्य ग्राहकांना बहुविध मार्गांनी आपल्याकडे आकर्षित करून घेण्याकरिता सक्षम असे वैविध्यपूर्ण ग्राहक संपादन नेटवर्क त्यांच्याकडे आहे. एसबीआय कार्ड ही तंत्रज्ञान आधारित कंपनी आहे. ही कंपनी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (“एनएसई”) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (“बीएसई”) वर सूचीबद्ध आहे.

नोंद घ्या – ‘एसबीआय कार्ड’ हे कंपनीचे ब्रँड नाव आहे आणि ती ‘एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड’ या नावाने नोंदणीकृत आहे. स्टॉक एक्स्चेंजमध्ये ही कंपनी SBICARD (एसबीआयकार्ड) या नावाने व्यवहार करते

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.