Sbi Card Share Price : स्टेट बँक कार्डच्या शेअरमध्ये या आठवड्यात का झाली घसरण?

Sbi Card Share Price : एसबीआय कार्डचा शेअर आठवड्यात ५ टक्क्यांनी खाली आला आहे.

43
Sbi Card Share Price : स्टेट बँक कार्डच्या शेअरमध्ये या आठवड्यात का झाली घसरण?
  • ऋजुता लुकतुके

स्टेट बँकेनं आपला क्रेडिट कार्ड उद्योग बँकिंग उद्योगापासून वेगळा केला आणि एसबीआय कार्ड ही नवीन कंपनी शेअरबाजारात नोंदणीकृत झाली या गोष्टीला आता सहा वर्षं होत आली. तेव्हाची ती एक मोठी बातमी होती आणि या शेअरने आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे ग्राहक आणि अल्पमुदतीची गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार यांना चांगला नफा मिळवून दिला. आताही कंपनी शेअर बाजारातील एक भरवशाची कंपनी म्हणून पाय रोवून उभी आहे. पण, अलीकडच्या काळात कंपनीच्या क्रेडिट कार्डांची विक्री म्हणावी तशी होत नाहीए. या क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेचा फटकाही कंपनीला बसला आहे आणि परिणामी, या तिमाहीत कंपनीची पिछेहाटही झाली आहे. तिमाही ताळेबंद बाहेर आल्यापासून तर कंपनीच्या शेअरमध्ये सध्या घसरणीचं वातावरण आहे. (Sbi Card Share Price)

आताही शुक्रवारी बाजार बंद होताना हा शेअर २ टक्क्यांनी घसरून ६८८ अंशांवर बंद झाला आहे. तर महिन्याभरात त्यात ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. (Sbi Card Share Price)

(हेही वाचा – Mazgaon Tadwadi Redevelopment Project : रहिवाशांना विश्वासात घेतले नसल्याचा आमदार जामसुतकरांचा आरोप)

New Project 2024 12 21T190509.911

एसबीआय कार्डांचं या बाजारपेठेतील स्थान अढळ आहे. अजूनही कंपनी देशातील दुसऱ्या क्रमांकाची क्रेडिट कार्ड कंपनी आहे. पण, तिमाही ताळेबंदातून काही नकारात्मक माहिती समोर आली आहे. कंपनीचा तिमाही नफा गेल्या वर्षी याच कालावधीतील नफ्याच्या तुलनेत ३२ टक्क्यांनी कमी झाला आहे आणि याचं कारण आहे कंपनीच्या क्रेडिट कार्डांवर वाढत असलेला फायनान्स खर्च. फायनान्स खर्च म्हणजे एखाद्या खर्चासाठी भांडवल उभं करताना द्यावे लागणारे पैसे. म्हणजेच कर्जावरील व्याज, इतर देय रक्कम वगैरे. स्टेट बँक कार्ड कंपनीसाठी गेल्यावर्षीच्या तुलनेत हा खर्च तब्बल ३० टक्क्यांनी वाढला आहे. आणि त्यामुळेच कंपनीचं नफ्याचं प्रमाण कमी झालं आहे. (Sbi Card Share Price)

शिवाय कंपनी चालवण्यासाठी येणारा ऑपरेशनल खर्च कंपनीने कमी तर केला. पण, तो फक्त ३ टक्के कमी करण्यात कंपनीला यश आलं. या सगळ्या गोष्टी कंपनीच्या ताळेबंदात अधोरेखित होत आहेत. इतकंच नाही तर कंपनीच्या क्रेडिट कार्डांना मागणी असली तरी को ब्रँडेड म्हणजे क्रेडिट कार्डावर सवलतीच्या दरात कुठलीही सुविधा उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत एसबीआय कार्ड कंपनी मागे राहिली आहे. नवीन युगात त्याचा फटकाही खपावर होतो आहे आणि या सगळ्यामुळे एसबीआय कार्ड कंपनीचा शेअर थोडा खाली आला आहे. (Sbi Card Share Price)

(हेही वाचा – Bangladesh मध्ये वर्षभरात २२०० हिंदूवर अत्याचार; केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांची माहिती)

(टिप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी त्यांच्या जोखमीवर शेअर बाजारात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरमध्ये खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.