स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना अनेक सुविधा बँकिंग पोर्टलवर मिळत आहेत. या सुविधेमध्ये एसबीआय ग्राहक त्यांच्या खात्यामध्ये किती रक्कम आहे हे तपासू शकता, फंड ट्रान्सफर करू शकता, नवीन चेकबुकसाठी रिक्वेस्ट करू शकता आणि त्याचप्रमाणे डेबिट कार्डसाठी अर्ज देखील करू शकता. या सुविधांव्यतिरिक्त देखील एसबीआय ग्राहकांना इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून फिक्स्ड डिपॉझिट आणि आवर्ती ठेव खाते तयार करण्याची सुविधा देखील आहे. इंटरनेट बँकिंग वापरण्यासाठी युजरनेम आणि लॉगिन पासवर्ड आवश्यक आहे. एसबीआय इंटरनेट बँकिंग सुविधा तुम्हाला तुमच्या घरून सुरक्षित बँकिंग व्यवहार करण्याची मुभा देते. तुम्ही यातून केव्हाही व्यवहार करू शकता. एसबीआयने त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे की, घरबसल्या इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही 8 कामे पूर्ण करू शकता
- पैशांचे विविध व्यवहार
- एटीएम कार्डसाठी अर्ज करणे
- डिपॉझिट खात्यासंबंधातील कामे
- बिलपेमेंट
- बचत बँक खात्यांचे स्टेटमेंट
- चेकबुकसाठी अप्लाय करणे
- यूपीआय सुरू आणि बंद करणे
- टॅक्स पेमेंट