SBI PO Salary : स्टेट बँकेच्या प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो?

SBI PO Salary : बँक अधिकाऱ्याचा पगार, भत्ते आणि जबाबदाऱ्या समजून घेऊया

50
SBI PO Salary : स्टेट बँकेच्या प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो?
SBI PO Salary : स्टेट बँकेच्या प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो?
  • ऋजुता लुकतुके

बँकेतील नोकरी ही पूर्वावार सुरक्षित आणि कमी त्रासाची समजली जाते. शिवाय इथं सरकारी नोकरीच्या तुलनेत पगारही चांगला आणि भत्तेही चांगले मिळतात. त्यामुळे बँकेतील नोकरी ही अनेकांची आवडीची नोकरी आहे. स्टेट बँक ही देशातील सगळ्यात मोठी सरकारी बँक आहे. शाखांचं जाळं हे देशभरात पसरलेलं आहे. सेवांच्या बाबतीत बँकिंगमधील सर्व सेवा ही बँक देत असते. अशावेळी बँकेत प्रोबेशनरी अधिकारी म्हणजेच पीओ म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या जबाबदाऱ्या अर्थातच मोठ्या आहेत. (SBI PO Salary)

(हेही वाचा- बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (Pocso Act) ३५ प्रकरणांवर सुनावणी)

बँकेतील दैनंदिन व्यवहारांवर लक्ष ठेवणं हे पीओचं महत्त्वाचं काम आहे. बँकेतील व्यवहारांचं अकाऊंटिंग, वित्तीय सेवा, महसूल, गुंतवणूक, कर्ज अशा सगळ्या प्रकारच्या व्यवहारांवर पीओला जागरुकपणे लक्ष द्यावं लागतं. अशा जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या पीओला स्टेट बँकेत सरासरी ४५,००० ते ५७,००० रुपये महिला असा पगार मिळतो. बँकेची शाखा शहरी भागात आहे की ग्रामीण तसंच सेवेतील अनुभव यावर पगार ठरतो. (SBI PO Salary)

स्टेट बँकेतील पीओचा मासिक पगार (रुपयांमध्ये)

मूळ पगार

४१,९००

पहिली पगार वाढ – ३६,०००

दुसरी पगार वाढ – ४६,४३०

तिसरी पगार वाढ – ४४,९००

चौथी पगार वाढ – ६३,८४०

महागाई भत्ता

मूळ पगाराच्या ४९.५ टक्के

आरोग्य विमा

कर्मचाऱ्याला १०० टक्के

कुटुंबीयांना ७५ टक्के

घरभाडे भत्ता

९,००० (शहरी शाखा)

७,००० (ग्रामीण शाखा)

वार्षिक मोबदला

७.५ ते १२.९ लाख

कर्जात सवलत

व्याजदरात सवलत

प्रवास भत्ता

रेल्वे तिकीट (एसी ३ टिअर) परतावा

इंधन भत्ता

रु. १,१०० ते १,३००

शहरी भागात मिळणारा भत्ता

३ ते ४ टक्के

इतर भत्ते

४,०००

 

या पगारातून तुमचा आयकर, निवृत्तीवेतनातील तुमचा वाटा, पीएफमधील वाटा असे खर्च वजा जाता तुमच्या हातात सरासरी ५२,५०० रुपये इतका पगार दर महिन्याला येतो. साधारपणे दर ४ वर्षांची पीओची पगारवाढ होते. मूळ पगारच वाढत असल्यामुळे इतर भत्तेही वाढत जातात.  (SBI PO Salary)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.