व्हॉट्सअॅप हे जगभरातील लोकप्रिय मेसेंजर अॅप आहे. परंतु व्हॉट्सअॅपवरून तुम्ही आता बॅंकेत न जाता अनेक बॅंकेची कामे घरबसल्या करू शकता. देशातील सर्वात मोठी बॅंक SBI ने सुद्धा Whatsapp बॅंकिंग सुरू केले आहे. या नवीन सुविधेमुळे तुम्ही बॅंकेच्या शाखेत न जाता फक्त Whatsapp द्वारे बरीच कामे करू शकणार आहात. बॅंकेने जारी केलेल्या व्हॉट्सअॅप नंबरवर चॅट करून तुम्ही बॅंक बॅलन्स, मिनी स्टेटमेंट संदर्भात माहिती मिळवू शकता.
( हेही वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या तक्रारी दूर होणार?)
व्हॉट्सअॅपद्वारे SBI बॅंकिंग सुविधेचा घ्या घरबसल्या लाभ
- तुम्हाला सर्वप्रथम SBI बॅंकेत व्हॉट्सअॅप बॅंकिंगसाठी नोंदणी करावी लागेल.
- नोंदणीसाठी तुम्ही WAREG लिहून स्पेस द्या, त्यानंतर तुमचा खाते क्रमांक लिहून 7208933148 या क्रमांकावर SMS करा.
उदाहरणार्थ : WAREG <space> खाते क्रमांक
या स्वरूपात संदेश 7208933148 या क्रमांकावर पाठवा.
- तुमचा जो क्रमांक SBI बॅंकेशी संलग्न ( SBI नोंदणीकृत क्रमांक) आहे त्यात नंबरवरून मेसेज पाठवणे गरजेचे आहे. तुमची नोंदणी पूर्ण झाल्यावर तुमच्या व्हॉट्सअॅप नंबर SBI च्या 9022690226 या क्रमांकावरून मेसेज येईल.
नोंदणीपूर्ण झाल्यावर तुम्हाला SBI कडून मेसेज येईल या मेसेजमधून खालील पर्यायांची निवड करू शकता.
१. बॅंक अकाऊंट बॅलन्स
२. मिनी स्टेटमेंट
३. व्हॉट्सअॅप बॅंकिंगमधून नोंदणी रद्द करण्यासाठी पर्याय
गरजेनुसार करा या सुविधेचा वापर
वरील संदेशानुसार तुम्ही तुमच्या गरजेनुसार सुविधेचा लाभ घेऊ शकता. जर तुम्ही १ क्रमांक टाइप करून पाठवला तर तुमचा बॅंक बॅलन्सबाबत तुम्हाला माहिती येईल. २ क्रमांक टाइप केल्यावर तुम्हाला मिनी स्टेटमेंटचा तपशील मिळेल. सध्या या ३ सुविधा SBI ने व्हॉट्सअॅपवर उपलब्ध केल्या आहेत.
या सुविधेमुळे तुम्हाला बॅंकेत जाऊन रांग लावण्याची गरज नसून ही सुविधा तुम्हाला 24/7 उपलब्ध असेल. यामुळे तुमची बॅंकेची कामे काही वेळात घरबसल्या व्हॉट्सअॅपद्वारे पूर्ण होतील.
Join Our WhatsApp Community