सावधान! ‘या’ बँकांच्या खातेदारांची होतेय फसवणूक! 

राष्ट्रीयकृत आणि मोठ्या खासगी बँकांच्या खातेदारांना कर परताव्याच्या नावाखाली खोट्या लिंक पाठवल्या जात आहेत. त्यातून खात्याची माहिती मिळवून खात्यातील पैसे काढून घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

154

जर तुम्हाला एखादा आयकर विभागाच्या नावाने इमेल आला आणि कर परतावा (टॅक्स रिटर्न) मिळवण्यासाठी तुम्हाला एखादा ऑनलाईन फॉर्म पाठवला जात असेल, ज्यामध्ये तुमची इत्यंभूत माहिती विचारली असेल, तर सावधान अजिबात तो फॉर्म भरू नका, तो ईमेल आणि तो फॉर्म खोटा असून यामुळे स्टेट बँक, आयसीआयसीआय, एचडीएफसी, ऍक्सिस आणि पंजाब नॅशनल बँक या बँकांच्या खातेदारांची फसवणूक होत आहे.

अशी होते फसवणूक! 

  • बँक खातेदारांच्या ईमेल, मोबाईलवर लिंक पाठवली जाते.
  • ही लिंक पाठवणारे अमेरिका आणि फ्रांस स्थित लिंक जनरेट करत आहेत.
  • कर परतावा मिळवण्यासाठी खातेदारांना संबंधित फॉर्म भरण्याचे आवाहन केले जाते.
  • त्यात पूर्ण नाव, पॅन, आधार, पत्ता, पिनकोड, जन्म तारीख, मोबाईल नंबर, बँकेचे नाव, आयएफएससी कोड, डेबिट कार्ड नंबर, सीव्हीसी नंबर मागितला जातो.
  • ही माहिती भरताच तुमच्या खात्यातील पैसे परस्पर काढले जातात. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि गृहिणींना लक्ष्य करण्यात येत आहे.

आयकर विभागाचे स्पष्टीकरण! 

या प्रकरणी आयकर विभागाने तातडीने स्पष्टीकरण दिले आहे. करदात्यांनो सावधान! कृपया तुम्हाला कर परताव्या संबंधी आलेल्या लिंकवर क्लिक करू नका. ती लिंक आयकर विभागाने पाठवलेली नाही. तुमच्या इ -फायलिंग खात्यातूनच आम्ही तुमच्याशी संबंध ठेवतो. ई-मेल लिंक, मोबाईल संदेशाद्वारे नाही, असे आयकर विभागाने म्हटले आहे.

(हेही वाचा : गल्लीतले दिल्लीत, दिल्लीत सुपर कॅबिनेटला जोर!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.