बाजारात टिकून राहण्यासाठी आणि लोकांना आपल्या प्रोडक्टमधून नेहमीच काहीतरी नवीन आणि हटके देण्याचा प्रयत्न सगळ्याच कार मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांकडून होत असतो. विना चालक चालणारी कार, तसेच गाडीचे इंजिन मागच्या बाजूला असणारी कार या सगळ्या हटके आणि लोकांना आकर्षित करणा-या गाड्यांनंतर आता ट्रान्सफरन्ट कारने जगाचे लक्ष वेधले आहे.
सर्वात सुरक्षित कार
जगाला तोंडात बोटं घालायला लावणारी आणि तोंड उघडे ठेवून पाहात रहाल, अशी पारदर्शक कार जर्मनीमध्ये तयार करण्यात आली आहे. ही कार नुकतीच फ्रॅंकफर्ट ऑटो शो मध्ये सादर करण्यात आली. जर्मनीच्या झेडएफ (ZF) या कंपनीने या पारदर्शक कारचे उत्पादन केले आहे. या कंपनीचा दावा आहे की, ही कार जगातील बाकी कारपेक्षा जास्त सुरक्षित आहे. या कारची टेक्नाॅलाॅजी इतकी अॅडव्हान्स आहे की, या कारने अपघात होण्याचे प्रमाण फारच कमी आहे.
( हेही वाचा: धक्कादायक! स्वत:च्याच श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून जोडप्याची आत्महत्या )
प्रायव्हसी मात्र नाही
या पारदर्शक कारमधून आतील दृश्य बाहेर दिसत असल्याने या कारमध्ये प्रायव्हसी मात्र अजिबात नाहीये. या कारमधून तुम्ही कारचे पार्टसही सहजपणे बाहेरुन पाहू शकता, तसेच पूर्णपणे अॅडव्हान्स टेक्नालाॅजीवर या कारची निर्मीती झाल्याने ही पारदर्शक कार इतरांपेक्षा वेगळी ठरते.
Join Our WhatsApp Community