Father’s Day 2022 : वडिलांना आकर्षक व्हॉट्सअ‍ॅप Sticker पाठवून द्या शुभेच्छा…जाणून घ्या सोपी प्रक्रिया

आपल्या वडिलांसाठी प्रत्येकाच्या आयुष्यात एक विशेष स्थान असते. वडिलांविषयी आदर, प्रेम व्यक्त करण्यासाठी दरवर्षी फादर्स डे (Father’s Day) साजरा केला जातो. यावर्षी १९ जूनला रविवारी फादर्स डे (Father’s Day 2022) साजरा केला जाणार आहे. आपल्या वडिलांना शुभेच्छा देण्यासाठी Whatsapp हे एक सोयीचे माध्यम आहे. यंदाच्या वर्षी तुम्ही तुमच्या वडिलांना पारंपरिक मेसेजपेक्षा Whatsapp स्टिकर पाठवून शुभेच्छा देऊ शकता.

तुम्ही तुमच्या घरापासून कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी दूर राहत असाल तर व्हॉट्सअ‍ॅप मेसेज सोबत तुम्ही असे विविध स्टिकर पाठवून आपल्या वडिलांना शुभेच्छा देऊ शकता. येत्या फादर्स डे ला वडिलांना स्टिकरच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा…

व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर कसे पाठवाल

  • यंदाचा फादर्स डे खास बनविण्यासाठी तुम्ही भन्नाट आणि आकर्षक स्टिकर पाठवून आपल्या वडिलांना शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्हाला अ‍ॅप इंस्टॉल करावे लागेल तुम्ही Google play store मधून आवडीचा अ‍ॅप डाऊनलोड करा.
  • अ‍ॅप डाऊनलोड केल्यावर तुम्ही आवडतील असे स्टिकर निवडा आणि अ‍ॅड टू Whatsapp या पर्यायावर क्लिक करा.
  • या स्टिकरला इंस्टॉल केल्यावर तुम्ही हे स्टिकर पॅक Whatsapp मध्ये सुद्धा वापरू शकता आणि हे स्टिकर पाठवून तुमच्या वडिलांना शुभेच्छा देऊ शकता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here