अनेक लोक सकाळी नाश्ता करताना ब्रेड खातात, ब्रेडपासून बनवलेले सॅंडविच म्हणजे आजच्या तरूणाईचा सर्वात आवडता पदार्थ! परंतु ब्रेड किंवा ब्रेडपासून तयार झालेले पदार्थ जेवढे रुचकर तेवढेच आरोग्यासाठी हानीकारक असतात. ब्रेडमध्ये असलेल्या पोटॅशियम ब्रोमेट या रसायनामुळे आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे जर तुम्ही दैनंदिन जीवनात व्हाईट ब्रेडचे सेवन करत असाल, तर तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता आहे.
( हेही वाचा : …अखेर एवढ्या वर्षांनी वन प्लस मोबाईल प्रेमींची प्रतीक्षा संपली! )
आरोग्याला धोका
व्हाईट ब्रेड बनवण्यासाठी गव्हाचे पीठ किंवा मैदा वापरला जातो. वेगवेगळ्या रसायनांचा वापर करून या पीठाला ब्लीच केले जाते, ज्यामुळे हे ब्रेड पांढरे दिसतात. क्लोरीन डायऑक्साइड आणि पोटॅशियम ब्रोमेट यांसारखी रसायने ब्रेड बनवताना वापरली जातात. या रसायनांचा वापर केल्यामुळे दैनंदिन जीवनात ब्रेडचे सेवन करणाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच व्हाईट ब्रेडमध्ये ग्लायमॅक्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते. ज्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता वाढते.
ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे आणि फिटनेसकडे विशेष लक्ष द्यायचे आहे त्यांनी चुकूनही व्हाईट ब्रेडचे सेवन करू नये. व्हाईट ब्रेडमळे वेगाने वजन वाढते.
Join Our WhatsApp Community