राष्ट्रीय समाज एम्प्लॉईज फेडरेशन – रासेफ आयोजित राष्ट्रीय समाज यशवंत गौरव सन्मान २०२३ यावर्षी हा पुरस्कार सेवा विवेक सामाजिक संस्थेला सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी प्रदान करण्यात आला. श्री सिद्धरामानंद स्वामीजी ( कागेनेली कानका गुरुपीठ कर्नाटक ), मुख्य न्यायाधीश वी. ईश्वररीह ( आंध्रप्रदेश ), एस एल अक्किसागर यांच्या हस्ते सेवा विवेक सामाजिक संस्थेचे सेवक राहुल भंडारकर व उमेश गुप्ता यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हा कार्यक्रम चर्चगेट येथील आय एम सी चेम्बर्स येथे झाला.
( हेही वाचा : वैद्यकीय क्षेत्राच्या नजरेतून कसा आहे अर्थसंकल्प २०२३? )
पुरस्कार सोहळ्यात ११ यशस्वी व्यक्तींचा सन्मान करण्यात आला ज्यांनी स्वतःच्या बळावर संघर्ष करून एक स्थान प्राप्त केले आहे. तसेच आर्थिक, सामाजिक, राजकीय, मीडिया, वैद्यकीय आणि कायदा इत्यादी क्षेत्रांमध्ये शून्यापासून सुरुवात केली. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी सेवा विवेक जे सामाजिक कार्य आदिवासी महिलांसाठी करत आहे त्याची स्तुती केली. पालघर जिल्ह्यातील शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या सेवा विवेकच्या कार्याची प्रशंसा प्रेक्षक वर्गात होती. प्रमुख पाहुण्यांनी संस्थेच्या कामाची स्तुती करताना लवकर सेवा विवेक सामाजिक संस्थेला भेट देऊन त्यांचे कार्य अजून जवळून समजून घेणार असल्याचे म्हटले.
सेवा विवेक सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासी गरुजू महिलांना घर काम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार लाभावा त्यांना सन्मान जनक रोजगार प्राप्त व्हावा या हेतूने सेवा विवेकने पुढाकार घेतला आहे. अशा महिलांना मोफत बांबू हस्तकलांचे प्रशिक्षण दिले जाते. पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यात येत असून आतापर्यंत शेकडोहून अधिक महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. वस्तू तयार करण्यासाठी कच्चा माल संस्थेच्या वतीने दिला जातो, तर तयार झालेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी बाजारपेठ संस्थेने शोधली असून वस्तूंच्या विक्रीतून आदिवासी महिलांना चांगले उत्पन्न मिळते आहे. आता या वस्तू ऑनलाईन बाजारात उपलब्ध होणार असल्यामुळे या आदिवासी महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे.
या मागणीचा थेट परिणाम पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांच्या रोजगार निर्मितीवर होत असून त्यांना प्रशिक्षणानंतर घरच्या घरी रोजची कामे सांभाळून बांबू काम करून रोजगाराची मोठी संधी मिळाली आहे. चांगला रोजगार प्राप्त होत असल्यामुळे महिला घराची जबाबदारी स्वीकारून मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देत आहे.
२०२२ सालच्या अखेरच्या मन की बात कार्यक्रमामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संस्थेच्या कामाची प्रशंसा केली तसेच गेल्या वर्षी सेवा विवेकच्या कार्याचा माजी राष्ट्रपती व राज्यपालांनी कौतुक केले आहे. माजी राष्ट्रपतीद्वारे हस्तकला प्रशिक्षित आदिवासी महिलांचा सत्कार करण्यात आला. या मुळेच आदिवासी समाजातील महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे. पालघरच्या पाड्यातील बांबू हस्तकलेपासून तयार झालेल्या वस्तू जगाच्या बाजारात विकल्या जात आहेत. ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर दिसणाऱ्या बांबूचे, वेताचे पेन स्टॅण्ड, मोबाईल होल्डर, मेकअप बॉक्स किंवा अनेक लहान मोठ्या वस्तू या पालघर जिल्ह्यातील अनेक गावात तयार झाल्या आहेत. आदिवासी पाड्यांवर तयार होणाऱ्या आणि आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रोजगार निर्मितीचे साधन ठरणाऱ्या अनेक वस्तू आता ऑनलाईन अर्थात जगाच्या पाठीवर पोहचल्या आहेत .पालघर जिल्यातील विविध गावात तयार होणाऱ्या वस्तू सेवा विवेक च्या माध्यमातून ऑनलाईन बाजारपेठतहि उपलब्ध आहेत. बांबूपासून अनेक उपयुक्त आणि शोभेच्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण सेवा विवेक संस्थेने आदिवासी महिलांना दिले आहे. सेवा विवेक सामाजिक संस्थेतच प्रशिक्षण घेऊन मग प्रशिक्षक झालेल्या १० ते १२ महिलांनी आतापर्यंत शेकडो आदिवासी महिलांना या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. नारी सक्षम तर परिवार आणि समाज सक्षम, समाज सक्षम तर राष्ट्र सक्षम या विचाराने प्रेरित होऊन २०१४ पासून सेवा विकास संस्थेने कामाला सुरुवात केली. कुपोषण, आरोग्य, शिक्षण या समस्या आदिवासी महिलांना रोजगार मिळाला तरच संपुष्टात येतील. याच विचारातून रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. राष्ट्र सक्षम होण्यासाठी सर्वात शेवटचा घटक असलेला आदिवासी आणि त्यातही आदिवासी स्त्री सक्षम व्हावी. याच एकमेव ध्येयाने संस्थेची वाटचाल सुरु आहे.