Severe Rainfall Alert : गंभीर पावसाचा इशारा कसा दिला जातो? कशी काम करते यंत्रणा? जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये!

60
Severe Rainfall Alert : गंभीर पावसाचा इशारा कसा दिला जातो? कशी काम करते यंत्रणा? जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये!

भारतीय हवामान विभागाची थट्टा मस्करी बर्‍याचदा केली जाते. मात्र ही सेवा कशी काम करते हे तुम्हाला माहिती आहे का? जनसामान्यांना आणि आपत्कालीन परिस्थितीत कार्य करणाऱ्यांना हवामानानुसार सूचना मिळावी या उद्देशानेच ही सेवा कायम कार्यरत असते. सूचना आधीच मिळाली तर लोकांना आपल्या बचावासाठी योग्य ती पाऊलं उचलता येतात. तसंच आपत्कालीन सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही आपल्या पुढच्या कामासाठी सज्ज राहता येतं. (Severe Rainfall Alert)

सुचनेचे प्रकार :

पावसाविषयी सांगायचं झालं तर पुढच्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यासाठी पावसाच्या धोक्याच्या सूचना देण्यासाठी अतिवृष्टी, गडगडाट आणि वादळं, वीजा, बर्फ, धुकं, वारा या मुद्द्यांचा वापर करण्यात येतो. (Severe Rainfall Alert)

(हेही वाचा – Parliament Session : विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकुब)

धोक्याचा इशारा देण्यासाठी रंगांचा वापर :

हवामानाच्या धोक्याची तीव्रता स्पष्टपणे सांगण्यासाठी हवामान खात्याने काही रंगांची निवड केलेली आहे. वातावरणाच्या परिस्थितीत सामान्य किंवा गंभीर स्वरूपाचे बदल घडणार असतील तर त्यानुसार त्या-त्या रंगाचा इशारा नागरिकांना देण्यात येतो. जसे की, (Severe Rainfall Alert)

  • येलो अलर्ट

येलो अलर्टनुसार नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला जातो. येणाऱ्या नैसर्गिक समस्येला तोंड देण्यासाठी आधीच तयारी करून ठेवली पाहिजे. तसंच नागरिकांच्या प्रवासात आणि इतर दैनंदिन कामांमध्ये उशीर होऊ शकतो किंवा कामं रद्द होऊ शकतात. म्हणून नागरिकांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपली सगळी दैनंदिन कामं करायला हवीत. तसंच पुढील योजनाही या सर्व गोष्टींचा विचार करूनच आखाव्यात. (Severe Rainfall Alert)

  • ऑरेंज अलर्ट

गंभीर स्वरूपाच्या किंवा अतिशय वाईट हवामानामुळे ऑरेंज अलर्ट दिलेल्या परिसरातल्या लोकांच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतात. त्यांची दैनंदिन काम विस्कळीत होऊ शकतात. जसे की, रेल्वे बंद पडणे, वीजपुरवठा खंडित होणे, प्रवासात अतिविलंब होणे. म्हणून नागरिकांनी ऑरेंज अलर्टनुसार आपापल्या ठरलेल्या कामांच्या वेळा तसंच इतर महत्वाची कामं यांमध्ये आवश्यक ते बदल करणं अतिशय गरजेचं आहे. (Severe Rainfall Alert)

  • रेड अलर्ट

रेड अलर्ट म्हणजे धोक्याचा इशारा होय. अतिशय वाईट हवामान असते, त्यावेळेस नागरिकांनी तसंच सुरक्षा रक्षकांनी सर्वप्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी ठेवली पाहिजे, म्हणून रेड अलर्टचा इशारा दिला जातो. रेड अलर्टचा इशारा असल्यास पूर, चक्रीवादळ, वीजपुरवठा खंडित होणे, दरड कोसळणे, ढगफुटी होणे, मोठ्या प्रमाणात जीवितहानी होणे याप्रकारच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. म्हणून रेड अलर्टचा इशारा दिल्यास शक्यतो नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जातो. अशावेळी नागरिकांनीही शहरातले अधिकारी आणि वरीष्ठ पदांवरच्या लोकांचा सल्ला ऐकणे हेच योग्य आहे. (Severe Rainfall Alert)

धोक्याचा इशारा देण्यासाठी कोणत्या माध्यमांचा वापर करतात?

दूरदर्शन आणि रेडिओच्या माध्यमातून अगदी जुन्या काळापासून हवामानसंबंधी माहिती दिली जाते. तसेच हल्ली टेलिव्हिजन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना हवामानानुसार जागरूक राहायला सांगितलं जातं. याव्यतिरिक्त हल्ली कित्येक वेदर ऍप्स आहेत जे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता. जेणेकरून तुम्हाला हवामानाचा अचूक अंदाज घेता येतो. (Severe Rainfall Alert)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.