shaniwar wada : शनिवारवाडा या ऐतिहासिक वास्तूबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

31
shaniwar wada : शनिवारवाडा या ऐतिहासिक वास्तूबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

शनिवार वाडा म्हणजे पुणे शहरातली एक ऐतिहासिक वास्तू आहे. १७३२ साली बांधलेला हा वाडा १८१८ पर्यंत मराठा साम्राज्याच्या पेशव्यांचं निवासस्थान होता. हा वाडा त्याच्या स्थापत्य सौंदर्यासाठी आणि समृद्ध इतिहासासाठी प्रसिद्ध आहे.

छत्रपती शाहूंचे पंतप्रधान पेशवे बाजीराव पहिले यांनी शनिवार १० जानेवारी १७३० रोजी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानासाठी या वाड्याची पायाभरणी केली. म्हणून वाड्याचं नाव शनिवार वाडा असं ठेवण्यात आलं. वाडा बांधण्यासाठी जुन्नरच्या जंगलातून सागवान लाकूड आयात करण्यात आलं होतं.

तर चिंचवडजवळच्या खाणींमधून दगड आणण्यात आले होते. तसंच जेजुरीच्या चुनखडीच्या पट्ट्यांमधून चुना आणण्यात आला होता. शनिवारवाडा १७३२ साली बांधून पूर्ण झाला. या वाड्याची एकूण किंमत १६,११० रुपये एवढी होती. त्या काळी ही खूप मोठी रक्कम होती.

शनिवार वाड्याचा उद्घाटन समारंभ धार्मिक पद्धतींनुसार २२ जानेवारी १७३२ साली पार पडला. नंतर पेशव्यांनी तटबंदीच्या भिंती, बुरुज आणि दरवाजे; दरबार हॉल कारंजे आणि इतर इमारतींचा समावेश या वास्तूमध्ये केला गेला. (shaniwar wada)

(हेही वाचा – Ravichandran Ashwin Retirement : ‘केवळ शेवटची कसोटी म्हणून मला खेळवतायत असं नको होतं,’ – अश्विन)

शनिवार वाड्याला पाच दरवाजे आहेत

  • दिल्ली दरवाजा
  • मस्तानी दरवाजा
  • खिडकी दरवाजा
  • गणेश दरवाजा
  • जांभूळ दरवाजा किंवा नारायण दरवाजा

(हेही वाचा – तीन प्रमुख Warships राष्ट्राला समर्पित; पंतप्रधानांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण)

राजवाडे

शनिवार वाड्यातल्या महत्त्वाच्या इमारतींमध्ये थोरल्या रायांचा दिवाणखाना (बाजीराव पहिले), नाचाचा दिवाणखाना आणि जुना आरसा महाल यांचा समावेश आहे.

शनिवार वाड्यातल्या सर्व राज्य सभागृहांमध्ये उत्कृष्ट कोरीव काम केलेल्या सागवान कमानी असलेले दरवाजे होते. सागवान खांब छताला आधार देत होते. हे खांब सुंदर सागवान ट्रेसरी, कोरीव लता आणि फुलांनी सजवलेले होते. वाड्याच्या छतावर उत्कृष्ट काचेचे झुंबर लटकवलेले होते.

मजले अत्यंत पॉलिश केलेल्या संगमरवरीपासून तयार केलेले आणि मोजेक पॅटर्नमध्ये व्यवस्थित तयार केले गेले होते. त्यावर समृद्ध पर्शियन गालिचे सजवलेले होते. वाड्याच्या भिंतींवर हिंदू महाकाव्ये रामायण आणि महाभारतातील दृश्ये असलेली चित्रे होती.

या वाड्याची रचना आणि बांधकाम शिवराम कृष्णा, देवाजी सुतार, कोंडाजी सुतार, मोरारजी पाठरवत, भोजराजा (जयपूरचे जडणकाम तज्ञ) आणि राघो (चित्रकार) यांच्यासारख्या सुप्रसिद्ध कारागिरांनी केलं होतं.

शनिवारवाड्याचा संकुल सात मजली उंच होता. वरच्या मजल्यावर मेघडंबरी नावाचं पेशव्यांचं निवासस्थान होतं. इथून १७ किलोमीटर एवढ्या अंतरावर असलेल्या आळंदी इथल्या ज्ञानेश्वर मंदिराचा शिखर दिसत होता. (shaniwar wada)

(हेही वाचा – vishrambaug wada : विश्रामबाग वाड्यात कोण राहत होतं आणि आता या वाड्यात काय होतं?)

कारंजे

शनिवार वाड्याच्या संकुलात एक कमळाच्या आकाराचे कारंजे होते. ते बाळ पेशवे सवाई माधवराव यांच्यासाठी बांधण्यात आले होते. ते सोळा पाकळ्यांचे कमळाच्या आकाराचे कारंजे होते. त्याच्या प्रत्येक पाकळीला ऐंशी फूट कमान असलेले सोळा जेट्स होते. हे त्या काळातलं सर्वात गुंतागुंतीचे कारंजे होते. (shaniwar wada)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.