Share Market Holiday : शेअर बाजाराला आज सुटी आहे का? यावर्षी शेअर बाजार कधी बंद असणार?

25
Share Market Holiday : शेअर बाजाराला आज सुटी आहे का? यावर्षी शेअर बाजार कधी बंद असणार?
Share Market Holiday : शेअर बाजाराला आज सुटी आहे का? यावर्षी शेअर बाजार कधी बंद असणार?
  • ऋजुता लुकतुके

राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजार यांच्यासह देशभरातील शेअर बाजार शनिवारी ११ जानेवारीला कामकाजासाठी बंद असतील. शनिवार आणि रविवार हे शेअर बाजारासाठी सुटीचे दिवस आहेत. शेअर बाजाराचं कामकाज सोमवार ते शुक्रवार असं पाच दिवस चालतं. शुक्रवारी केले सौदेही दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी पूर्ण होतात. पण, शनिवार आणि रविवार सोडले तर या महिन्यात शेअर बाजाराला इतर कुठलीही सुटी नाही. पहिली सुटी थेट फेब्रुवारी महिन्यात २६ तारखेला आहे. या दिवशी महाशिवरात्री निमित्त शेअर बाजार बंद राहतील. (Share Market Holiday)

(हेही वाचा- आरेतील झाडे तोडू नका; Supreme Court ने मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला दिले आदेश)

समभागांच्या खरेदी – विक्रीबरोबरच चलनामधील व्यवहार, वायदे बाजार, ईटीएफ, कमोडिटी यांचे व्यवहारही शनिवारी व रविवारी बंद असतात. आणि ते आठवड्यातून पाच दिवस पार पडतात. (Share Market Holiday)

शेअर बाजाराच्या सुट्या या राष्ट्रीय शेअर बाजाराकडून नवीन वर्ष सुरू होताना सगळ्यांना कळवल्या जातात. आणि त्या सुट्यांचं पालन देशातील इतर शेअर बाजारही करतात. सर्व शेअर बाजारांचे कामकाजाचे तास ठरलेले आहेत. सकाळी नऊ ते सव्वानऊच्या दरम्यान प्री-ओपनिंग सत्र पार पडतं. आणि त्यानंतर सव्वानऊ वाजता वाजता नियमित सौद्यांना सुरुवात होते. तर साडे तीन वाजता शेअर बाजार बंद होतो. त्या दिवशी झालेले व्यवहार दुसऱ्या दिवशी आपल्या खात्यात दिसून येतात. शेअरमध्ये रोखीने झालेले व्यवहार दोन दिवसांनंतर दिसतात. (Share Market Holiday)

(हेही वाचा- Cardiac Arrest : कर्नाटकनंतर गुजरातमध्येही आठ वर्षांच्या दोन विद्यार्थिनींचा शाळेतच हार्टअटॅकने मृत्यू)

२०२५ मध्ये शेअर बाजारात शनिवार आणि रविवार व्यतिरिक्त एकूण १४ सुट्या आहेत. यातील पहिली सुटी थेट २६ फेब्रुवारीला महाशिवरात्रीची आहे. तर २६ जानेवारी हा सुटीची दिवस असला तरी तो रविवार आहे. २०२५ मधील शेअर बाजारातील सुट्या पाहूया, (Share Market Holiday)

२६ फेब्रुवारी (बुधवार) – महाशिवरात्र

१४ मार्च (शुक्रवार) – होळी

३१ मार्च (सोमवार) – ईद – उल – फित्र

१० एप्रिल (गुरुवार) – महावीरजयंती 

१४ एप्रिल (सोमवारी) – बाबासाहेब आंबेडकर जयंती

१८ एप्रिल (शुक्रवार) – गुड फ्रायडे 

१ मे (गुरुवार) – महाराष्ट्र दिवस

१५ ऑगस्ट (शुक्रवार) – स्वातंत्र्य दिवस 

२७ ऑगस्ट (बुधवार) – गणेश चतुर्थी 

२ ऑक्टोबर (गुरुवार) – गांधी जयंती व दसरा 

२१ ऑक्टोबर (मंगळवार) – लक्ष्मीपूजन 

२२ ऑक्टोबर (बुधवार) – दिवाळी

५ नोव्हेंबर (बुधवार) – गुरूनानक जयंती 

२५ डिसेंबर (गुरुवार) – नाताळ 

(हेही वाचा- “राज ठाकरे की उद्धव ठाकरे? एकनाथ शिंदे की अजित पवार? “, CM Devendra Fadnavis मनमोकळेपणाणे म्हणाले…)

२१ ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन असल्यामुळे या दिवशी हिंदू नववर्षदिनी मूहूर्ताचं ट्रेडिंग पार पडेल. 

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.